जॉन मॅकअफी

जॉन मॅकअफी

जन्म – १८ सप्टेंबर १९४५ (ब्रिटन)

मृत्यू – २३ जून २०२१

परिचय :

 • जगातील संगणकांचा अविभाज्य घटक बनलेल्या “अँटी व्हायरचे” जनक जॉन मॅकअफी यांचा बर्सिलोनानजीकच्या तुरुगांत संशयास्पद मृत्यू झाला. ते ७५ वर्षाचे होते.
 • जगातील पहिले ॲण्टिव्हायरस सॉफ्टवेअर जॉन मॅकअफी यांनी १९८७ मध्ये तयार केला होता.
 • गणितात पदवी घेतलेल्या मॅकअफी यांनी ‘नासा’त प्रोग्रॅमर म्हणून नोकरीस सुरुवात केली होती.
 • झेरॉक्स, प्रोजेक्ट अपोलो, लॉकहेड मार्टिन अशा कंपन्यांतही काम केले.
 • १९७० मध्ये त्यांनी खासगी कंपनीत सॉफ्टवेअर डिझायनर म्हणून काम केले.
 • पाकिस्तानातून विकसित झालेला जगातील पहिला ‘व्हायरस’ त्यांच्यापर्यंत पोहोचला आणि १९८७ मध्ये जगातील पहिला अँण्टिव्हायरस प्रोग्रॅम लिहिला.
 • त्यानंतर त्यांनी ‘मॅकअफी असोसिएट्‌स’ कंपनीची स्थापना केली. २ वर्षांतच ते या कंपनीपासून विभक्त झाले व ‘इंटेल कॉर्पोरेशन’ने कंपनी विकत घेतली.
 • बांधकाम व्यवसाय, वनौषधींचे उत्पादन, कम्प्युटर सुरक्षा नेटवर्क आणि बिटकॉइन अशा अनेक क्षेत्रात नवनवे प्रयोग केले.
 • क्रिप्टोकरन्सी व्यवसायात ते कायद्याच्या कचाट्यात सापडले व त्यांच्यावर करचोरीचा ठपकाही होता. २००८ च्या जागतिक मंदीत त्यांची आर्थिक घसरण झाली.
 • अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे नामांकन मिळविण्याचे दोन प्रयत्न अपयशी ठरले.
 • स्पेनमधून स्थलांतर करतांना त्यांना पोलिसांनी पकडले व ३० वर्षे शिक्षा होण्याच्या भीतीने त्यातूनच त्यांनी कोठडीत आत्महत्या केली असावी, असा संशय आहे.

Contact Us

  Enquire Now