जागतिक हवामान संघटना अहवाल – २०२१

जागतिक हवामान संघटना अहवाल – २०२१

 • जागतिक हवामान संघटनेने (WMO) आपला २०२१ चा अहवाल, “The atlas of Mortality and Economic Losses from weather, climate, and water extremes (१९७०-२०१९)” या शीर्षकाखाली प्रकाशित केला.
 • या अहवालानुसार वणवे, उष्णलहर, पूर यांचे प्रमाण हवामान बदलामुळे गेल्या ५० वर्षांत पाच पटींने वाढले आहे.
 • तसेच यामुळे दिवसाला सरासरी ११५ जणांचा बळी विविध आपत्तीमुळे होत आहे. त्यातील ९१ टक्के मृत्यू हे विकसनशील राष्ट्रांत होत आहे.

महत्त्वाचे निष्कर्ष

 • सर्वाधिक हानी दुष्काळांमुळे होत आहे.
 • जरी आपत्तींची संख्या आणि तीव्रता वाढत असली तरी बळी पडणाऱ्यांची संख्या तीन पटींनी कमी झाली आहे.
 • यामध्ये आपत्ती निवारण यंत्रणेचा यशस्वी सहभाग अधोरेखित केला आहे.
 • जागतिक हवामान संघटना (WMO)
 • स्थापना – २३ मार्च १९५०
 • मुख्यालय – जिनिव्हा, स्वित्झर्लंड
 • अध्यक्ष – गेरहार्ड एड्रियन
 • सदस्य – १९३ देश

Contact Us

  Enquire Now