जागतिक लिंग आधारित अंतर निर्देशांक २०२१

जागतिक लिंग आधारित अंतर निर्देशांक २०२१

  • नुकताच जागतिक आर्थिक मंच (WEF) या संस्थेने १५वा जागतिक लिंग आधारित अंतर निर्देशांक (Global Gender Gap Index-GGGI)-२०२१ जाहीर केला. या अहवालात भारत १४०व्या क्रमांकावर असून मागील वर्षीपेक्षा भारताची 
  • २८ क्रमांकाने घसरण झाली आहे. या लेखात आपण या निर्देशांकाविषयी सविस्तर आढावा घेऊया.
  • जागतिक आर्थिक मंचाकडून २००६ पासून दरवर्षी GGGI प्रकाशित केला जातो.
  • २०२१ चा निर्देशांक काढण्यासाठी १५६ देशांचा विचार करण्यात आला. यामध्ये भारत १४०व्या क्रमांकावर राहिला असून दक्षिण आशियात वाईट कामगिरी असलेला भारत तिसरा देश ठरला आहे. भारताला ६२.५% गुण मिळाले आहेत.
  • २०२०च्या अहवालात भारत १५३ देशांत ११२व्या क्रमांकावर होता.
  • २०२१ च्या GGGI मध्ये आईसलँड प्रथम क्रमांकावर असून त्यानंतर फिनलँड, नॉर्वे, न्यूझीलंड यांचा क्रमांक लागतो.
  • यावर्षी प्रथमच अफगाणिस्तान, गयाना आणि नायजर या देशांचा या अहवालात अभ्यास केला गेला.

GGGI मोजताना खालील चार घटकांचा विचार केला जातो. 

१. आर्थिक सहभाग व संधी – यामध्ये श्रमसहभाग, मजुरी, उत्पन्न, कौशल्य क्षमता इत्यादी विचारात घेतात.

२. शैक्षणिक क्षमता – यामध्ये प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षण साक्षरता विचारात घेतात.

३. आरोग्य व टिकाव – यामध्ये सरासरी आयुर्मान व लिंग गुणोत्तर विचारात घेतात.

४. राजकीय सशक्तीकरण – यामध्ये संसदेतील सहभाग, मंत्रिमंडळातील सहभाग व नेतृत्वातील सहभाग विचारात घेतात.

वरील चार घटकांमधील स्त्री व पुरुषांच्या सहभागातील अंतर मोजून GGGI काढला जातो.

GGGI ० ते १ या दरम्यान असतो. याची किंमत ० म्हणजे स्त्री व पुरुषांच्या विकासाचे व सहभागाचे अंतर जास्त असणे व किंमत एक असणे म्हणजे अंतर कमी असणे.

GGGI हा अहवाल लिंगाधारित पातळी न मोजता अंतर मोजतो.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (जागतिक आर्थिक मंच) 

स्थापना ः १९७१ मुख्यालय ः जिनिव्हा, स्वित्झर्लंड 

प्रकाशने : जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक, GGGI, जागतिक आयटी अहवाल इत्यादी.

Contact Us

    Enquire Now