जागतिक पुस्तक दिन

जागतिक पुस्तक दिन

  • जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन दरवर्षी २३ एप्रिल रोजी युनेस्को आणि त्यासंबंधित संस्थांमार्फत जगभरात साजरा केला जातो.
  • यावर्षीचे वर्ल्ड बुक कॅपिटल हे मलेशियाची राजधानी असलेले क्वालालंपूर हे आहे.
  • लोकांमध्ये वाचनाची सवय व गोडी वाढीस लागावी आणि जगभरातील लेखक आणि पुस्तकांचा सन्मान करणे हे हा दिवस साजरा करण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.
  • २३ एप्रिल हा दिवस विल्यम शेक्सपिअर, मिगुएल सर्व्हंटिस आणि इंका गार्सिलोसो यांच्यासह जगातील ख्यातमान व्यक्तींचा स्मृतिदिन आहे. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी युनेस्कोने २३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून घोषित केला.
  • हा दिवस पहिल्यांदा २३ एप्रिल १९२३ रोजी स्पेनमधील पुस्तक विक्रेत्यांनी साजरा केला. त्यानंतर १९९५ मध्ये पॅरिसमध्ये युनेस्कोची सर्वसाधारण सभा झाली. ज्यात जागतिक पुस्तक दिन दरवर्षी साजरा केला जाईल असा निर्णय घेण्यात आला.

Contact Us

    Enquire Now