जागतिक पर्यावरण आणि हवामान कृती नागरिक पुरस्कार
- सुरतचे उद्योजक विरल देसाई यांना प्रतिष्ठेचा असा जागतिक पर्यावरण आणि हवामान कृती नागरिक पुरस्कार (ग्लोबल एन्व्हायर्नमेंट अँड क्लायमेट ॲक्शन सिटिझन ॲवॉर्ड) प्रदान करण्यात आला आहे.
- त्यांच्या पर्यावरण प्रेमामुळे विरल देसाई यांना ग्रीनमॅन म्हणून देखील ओळखले जाते.
- विरल देसाई यांना संस्कृती युवा संस्थेचा ‘भारत गौरव सन्मान’देखील प्राप्त झाला आहे.
- ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स, न्यूझीलंड आणि मलेशिया या ११ देशांतील २८ प्रमुख व्यक्तींना प्रतिष्ठित पुरस्कारानी गौरविण्यात आले.
- विरल देसाई हे एकमेव भारतीय होते ज्यांना हवामान कृतीसाठी सन्मान मिळाला.
जागतिक पर्यावरण आणि हवामान कृती नागरिक पुरस्कार :
- हा एक पर्यावरणीय पुरस्कार आहे, जो “हार्वर्ड मेडिकल स्कूल सेंटर फॉर हेल्थ अँड ग्लोबल एन्व्हायर्नमेंट” ने स्थापित केला आहे. जागतिक पर्यावरण पुनर्संचयित करण्यासाठी आणि संरक्षित करण्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तीला हा दरवर्षी दिला जातो.
हार्वर्ड मेडिकल स्कूल सेंटर फॉर हेल्थ अँड ग्लोबल एन्व्हायर्नमेंट :
- १९९६ मध्ये जागतिक पर्यावरणीय बदलामुळे मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांची समज वाढवण्यासाठी याची स्थापना करण्यात आली.
- हे हार्वर्ड टी. एच. चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ येथे आहे. आपले आरोग्य हे पर्यावरणाच्या आरोग्यावर अवलंबून आहे हे लोकांना समजण्यास मदत करण्यासाठी केंद्र कार्य करते.
इतर मानकरी :
- प्रेरक वक्ता आणि पद्मश्री गौर गोपालदास
- पोलो खेळाडू अश्विनी कुमार शर्मा
- अक्षय पात्र फाउंडेशनचे अध्यक्ष पद्मश्री मधु पंडित दास
- वादक पद्मभूषण पंडित विश्व मोहन भट्ट
- पद्मश्री रामकिशोर छिपा
- निर्भयाची आई आशा देवी
- गुंतवणूकदार बँकर साकेत मिश्रा आणि इतर.