जागतिक जैवविविधता दिन
- दरवर्षी जगभरात २२ मे हा दिवस जागतिक जैवविविधता दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाकडून २००१ पासून हा दिवस साजरा करण्यात येऊ लागला.
- We're part of the solution ही या दिनासाठीची २०२१ सालासाठीची संकल्पना आहे.
जैवविविधता :
- जैवविविधता म्हणजे भूस्थित, सागरी व जलीय परिसंस्था, ज्यांचा सजीव भाग आहेत, अशा सर्व परिसंस्थांमधील जीवनाची असणारी विविधता होय. यामध्ये प्रजाती अंतर्गत, प्रजाती-प्रजातींमधील आणि परिसंस्थांच्या विविधतेचा समावेश होतो.
- पृथ्वीवरील बरीचशी जैवविविधता ही विषुववृत्ताभोवती उष्णकटिबंधीय व उप-कटिबंधीय प्रदेशांमध्ये एकवटलेली आहे. विषुववृत्तावर सर्वात जास्त विविधता आढळते आणि ध्रुवाकडे कमी होत जाते.
जैवविविधता करार (Convention on Biological Diversity – CBD)
- संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) ने १९८८ मध्ये जैवविविधतेबाबत आंतरराष्ट्रीय कराराच्या आवश्यकतेविषयी एक कार्यगट नेमला. १९९२ मध्ये नैरोबी परिषदेमध्ये जैवविविधता कराराचा मसुदा स्वीकारण्यात आला.
- ५ जून १९९२ रोजी रियो दि जानेरो या शहरात आयोजित यूएन आयोजित पर्यावरण व विकास या वसुंधरा परिषदेत हा करार हस्ताक्षरासाठी आला. जून १९९३ पर्यंत १६८ देशांनी यावर सह्या केल्या.
- २९ डिसेंबर १९९३ रोजी हा करार अंमलात आला.
या कराराची तीन मुख्य ध्येये आहे
१. जैवविविधता संवर्धन
२. जैवविविधतेतील घटकांचा शाश्वत वापर
३. जैविक संसाधन संपत्तीच्या वापरातून होणार्या फायद्यांचे समान वाटप