
जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धा, 2021
- 19 ते 25 जुलैला बुडापेस्ट (हंगेरी) येथे पार पडलेल्या जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेमध्ये भारताने एकूण तेरा पदकांवर आपले नाव कोरले.
- यामध्ये पाच सुवर्ण, एक रजत तर एकूण सात कांस्य पदकांचा समावेश होता.
- 73 किलो वजनाच्या गटामध्ये Kseniya Patapovich हिला हरवून भारताच्या प्रिया मलिक हिने सुवर्णपदक मिळवले. जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय ठरली.
- जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धा ही दरवर्षी होणारी 16 ते 17 वर्षे वयोगटातील कुस्ती स्पर्धा आहे.
- यामध्ये फ्रीस्टाइल, ग्रीको-रोमन आणि महिला कुस्ती हे तीन प्रकार खेळले जातात.
विजेता | प्रकार | पदक |
प्रिया मलिक | महिला 73 किलो वजनगट | सुवर्णपदक |
तन्नू | महिला 43 किलो वजनगट | सुवर्णपदक |
कोमल पांचाल | महिला 46 किलो वजनगट | सुवर्णपदक |
अमन गुलिया | पुरुष 48 किलो फ्रीस्टाइल | सुवर्णपदक |
सागर जागलान | पुरुष 80 किलो फ्रीस्टाइल | सुवर्णपदक |
जस्करण सिंह | पुरुष 60 किलो फ्रीस्टाइल | रजत पदक |
चिराग | पुरुष 51 किलो फ्रीस्टाइल | कांस्य पदक |
जयदीप | पुरुष 71 किलो फ्रीस्टाइल | कांस्य पदक |
अंकित गुलिया | पुरुष 65 किलो ग्रीको-रोमन | कांस्य पदक |
अंतिम | महिला 53 किलो वजनगट | कांस्य पदक |
वर्षा | महिला 65 किलो वजनगट | कांस्य पदक |
साहिल | पुरुष 110 किलो फ्रीस्टाईल | कांस्य पदक |
सुमित | पुरुष 60 किलो ग्रीको-रोमन | कांस्य पदक |
- या स्पर्धेचे आयोजन युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) या संघटनेद्वारे केले जाते.ही स्वित्झरलंडमधील संस्था आहे.