जागतिक कामगार दिन
- जगभरातील कामगार चळवळीच्या गौरवासाठी एक मे हा जागतिक कामगार दिन म्हणून पाळला जातो तसेच दरवर्षी हा दिवस जगभरातील ८० पेक्षा जास्त देशांमध्ये सुट्टीचा दिवस म्हणून पाळला जातो.
- सतराव्या शतकाच्या मध्यापासून सुरू झालेल्या औद्योगिक क्रांतीने कामगारांच्या शोषणाला, पिळवणुकीला सुरुवात झाली.
- १ मे १९८६ रोजी अमेरिकेतल्या कामगार संघटनांनी कामासाठी ८ तासांची मागणी केली. यावेळी झालेल्या रक्तरंजित आंदोलनानंतर १ मे १९८० ला हे आंदोलन यशस्वी होऊन योग्य पगार, ८ तास काम, पगारी सुट्टी या मागण्या मान्य झाल्या. तेव्हापासून अमेरिकेत हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.
- भारतातल्या ‘लेबर किसान पार्टी’ने १ मे १९२३ रोजी पहिल्यांदा कामगार दिन साजरा केला होता.
- या दिनाची २०२१ सालासाठीची थीम ः ‘Maintaining safety and security at the workplace’.