जागतिक आदिवासी दिन

 जागतिक आदिवासी दिन

 • जगातील विविध देशात साधारणपणे जंगलामध्ये वास्तव्य करणाऱ्या मूळ निवासी समूहांनी पर्यावरण जपण्याचे मोलाचे कार्य केले. या आदिम जमातींचे अस्तित्व मान्य करण्यासाठी आणि या जमातींना सुविधा पुरविण्याकडे लक्ष वेधणे व त्या मिळवून देण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने ९ ऑगस्ट १९९४ या दिवशी आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस जाहीर केला.
 • तसेच संयुक्त राष्ट्रसंघाने आदिवासी समुदायाच्या अधिकाराच्या संरक्षणार्थ १९९३ हे वर्ष जागतिक आदिवासी वर्ष म्हणून घोषित केले. तसेच १९९४-२००५ हे दशक ‘आदिवासी दशक’ म्हणून साजरे केले.
 • २०२१ ची थीम : Leaving no one behind : indigenous peoples and the call for a new social contract.
 • २०२० ची : COVID-१९ and Indigenous Peoples’ resilience

जगातील आदिम जमाती – देश

१) रेड इंडियन – उत्तर अमेरिका

२) गॉशो – दक्षिण अमेरिका

३) दक्षिण आफ्रिका छुतिया, बोडो, चकमा – आसाम

४) एस्किमो – अलास्का, कॅनडा गुज्जर – हिमाचलप्रदेश

५) मसाई-केनिया, टांझत्तनियाभिल्ल, ठाकर, कोलम – महाराष्ट्र

६) पिग्मी – काँगो खोरे गारो, हमार, खासी – मेघालय

७) बोरो इंडियन – ॲमेझॉन खोरे कुकी, मायोन – मणिपूर

८) सेमँग – मलेशिया अंगामी, कुकी, सेमा – नागालँड

९) बदाऊन, सहारा वाळवंट भुतिया, – सिक्कीम

१०) ॲबॅरिजन – ऑस्ट्रेलिया

११) माओरी – न्यूझीलंड

भारतातील आदिवासी जमीतींची माहिती :

अनुसूचित जमातीची व्याख्या :

 • भारतीय घटनेच्या कलम ३४२ (१) अनुसार राष्ट्रपतींनी घोषित केलेल्या जमातींना ‘अनुसूचित जमाती’ म्हणतात.
 • च्या लोकसंख्येनुसार अनुसूचित जमातींची भारतातील संख्या १०,४२,८१,०३४ असून एकूण लोकसंख्येपैकी ८.६% आहे.
 • आदिवासी लोकसंख्येनुसार पहिली पाच राज्ये : मध्यप्रदेश, महाराष्ट्र, ओदिशा, राजस्थान, गुजरात
 • महाराष्ट्रातील जमातींचे विवरण : 
 • महाराष्ट्रातील आदिवासी लोकसंख्या : १.५ कोटी
 • आदिवासी लोकसंख्येनुसार पहिले पाच जिल्हे : नाशिक, नंदुरबार, पालघर, धुळे, जळगाव

Contact Us

  Enquire Now