जमशेदजी टाटा जगातील ‘श्रीमंत दानशूर’
- जगातील १०० वर्षांतील ५० दानशूर व्यक्तींची यादी ‘हरून रिसर्च’ आणि एडलगिव्ह फाऊंडेशन’ यांनी तयार केली आहे.
- या अहवालानुसार भारतीयांच्या दृष्टीने अभिमानाची बाब म्हणजे यात प्रथम स्थानावर टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे नाव आहे.
- ‘भारतीय उद्योगाचे पितामह’ असलेल्या जमशेदजी टाटा यांनी १०२.४ अब्ज डॉलर एवढे दान केले आहे.
- ‘हरून’ संस्थेचे अध्यक्ष व मुख्य संशोधक रुपर्ट हुगवेर्फ म्हणाले की, या अहवालानुसार या यादीत अमेरिका युरोपीय व्यक्तीचे वर्चस्व असले तरीही जगातील परोपकारी व्यक्ती म्हणून जमशेदजी टाटा ठरले आहेत.
- या अहवालानुसार टाटा यांनी एकूण संपत्तीच्या ६६ टक्के संपत्तीचे दान केले आहे.
- १८९२ मध्ये उच्च शिक्षणासाठी ‘जेएन टाटा इन्डोमेंट ची स्थापना केली होती. त्या माध्यमातून त्यांनी मदत, देणगी देण्यास सुरुवात केली.
- २०२१ मधील पहिले दहा देणगीदार, त्यांची कंपनी व दान रक्कम
देणगीदार | कंपनी | दान रक्कम (अब्ज डॉलर) |
१) जमशेदजी टाटा | टाटा सन्स | १०२.४ |
२) बिल-मेलिंडा गेट्स | मायक्रोसॉफ्ट | ७४.६ |
३) हेन्नी वेलकम | वेलकम | ५६.७ |
४) हॉवर्ड हगेस | हगेस एअरक्राफ्ट | ३८.६ |
५) वॉरन बफे | बर्कशायर हायवे | ३७.४ |
६) जॉर्ज सोरोस | सोरोस फंड मॅनेजमेंट | ३४.८ |
७) हॅन्स विल्सडॉर्फ | रोलेक्स | ३१.५ |
८) जेके लिली सिनिअर | एली लिली ॲण्ड कंपनी | २५.५ |
९) जॉन डी रॉकफेलर | स्टॅंडर्ड ऑइल कंपनी | २६.८ |
१०) एडसेल फोर्ड | फोर्ड मोटर कंपनी | २६.७ |