जनगणना आणि एनपीआर

जनगणना आणि एनपीआर

 • जनगणनेचा पहिला टप्पा आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) अद्ययावत करण्यासाठी तपशील गोळा करण्यासाठीचे काम किमान सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे.

जनगणना :

 • लॉर्ड मेयोद्वारे १८७२मध्ये पहिली जनगणना करण्यात आली. परंतु ही अपूर्ण जनगणना होती.
 • पहिली पूर्ण जनगणना १८८१ पासून लॉर्ड रिपनद्वारे घेण्यात आली. त्यानंतर दर दहा वर्षांनी भारतामध्ये जनगणना होत आहे.
 • २०११ ची जनगणना ही सलग १५वी आणि स्वातंत्र्यानंतरची सातवी जनगणना होती.
 • त्यावेळी डॉ. सी. चंद्रमौली हे भारताचे जनगणना आयुक्त होते.
 • जनगणना ही केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत कार्यरत जनगणना आयुक्त पार पाडतात.
 • त्यासाठी १९४८मध्ये जनगणना कायदा करण्यात आला.
 • यावर्षी होणारी जनगणना ही सलग १६वी तर  स्वातंत्र्यानंतरची आठवी जनगणना असेल.
 • तसेच इतिहासात पहिल्यांदाच जनगणनेविषयी माहितीचे संकलन मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर)

 • एनपीआरचा उद्देश देशातील प्रत्येक सामान्य रहिवाशाचा सर्वसमावेशक ओळख डेटाबेस तयार करणे हा आहे.
 • भारतातील प्रत्येक सामान्य रहिवाशासाठी एनपीआरमध्ये नोंदणी करणे अनिवार्य आहे.
 • जनगणनेद्वारे माहिती संकलित केला जात असताना, जनगणना अधिनियम, १९४८च्या कलम १५ नुसार, जनगणनेमध्ये संकलित केलेली सर्व वैयक्तिक स्तरावरील माहिती गोपनीय असते आणि ‘केवळ एकत्रित डेटा विविध प्रशासकीय स्तरांवर जारी केला जातो.’
 • देशांमध्ये सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ वास्तव्य करणाऱ्या/ करण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तीस ‘सामान्य रहिवासी’ (usual resident) असे म्हटले जाते.
 • एनपीआर पहिल्यांदा २०१० मध्ये संकलित केले गेले आणि २०१५ मध्ये अद्ययावत केले गेले आणि त्यामध्ये अगोदरच ११९ कोटी रहिवाशांचा डेटाबेस आहे.

Contact Us

  Enquire Now