जगातील पहिला व्यावसायिक री-प्रोग्रॅम करण्याजोगा उपग्रह

जगातील पहिला व्यावसायिक री-प्रोग्रॅम करण्याजोगा उपग्रह

 • युरोपियन अंतराळ संस्थेने ( ESA )  31 जुलै रोजी त्यांच्या फ्रेंच गयाना येथील प्रक्षेपण  तळावरून Ariane-5 या प्रक्षेपक वाहनाच्या सहाय्याने Eutelsat Quantum  हा जगातील पहिला व्यवसायिक रीप्रोग्रॅम करता येणारा उपग्रह प्रक्षेपित केला.
 • या उपग्रहामुळे संबंधित उपग्रह अवकाशीय कक्षेमध्ये प्रक्षेपित केल्यानंतर सुद्धा  आपल्या गरजांनुसार त्याच्या कार्यामध्ये बदल करण्याचा आदेश देता येईल.
 • यासाठी या उपग्रहामध्ये विशिष्ट प्रकारचे सॉफ्टवेअर बसविण्यात आले आहे.
 • उपग्रहाचा जीवनकाल 15 वर्षे असेल.
 • पश्चिम आफ्रिका ते  आशिया एवढा विस्तृत प्रदेश या उपग्रहाच्या निरीक्षणाखाली असेल. 
 •  वेळेनुसार बदलत्या गरजांना पूर्ण करणारा हा उपग्रह आहे.
 • 3.5 टन वजन असणाऱ्या या उपग्रहामध्ये एकूण आठ कम्युनिकेशन बीम्स आहेत.
 • यामुळे हा उपग्रह त्याची संप्रेषण फ्रिक्वेन्सी गरजेनुसार बदलू शकतो. ज्याने मोबाईल कवरेज,  विमानांना दिशादर्शक  तसेच पाण्यामधील जहाजांना सुद्धा दिशादर्शन करता येणार आहे.
 • तसेच आपत्तीचे व्यवस्थापन करणे सुकर होणार आहे. 
 • यातील अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे सायबर हल्ला करणाऱ्या सिग्नलचा सुद्धा शोध घेणे शक्य  होणार आहे. 
 • ESA ही जगातील प्रमुख अंतराळ संस्थांपैकी एक असून तिचे मुख्यालय पॅरिस ( फ्रान्स) येथे आहे.
 • भारतातील बरेच जड संप्रेषण उपग्रह (INSAT आणि GSAT) ज्यांना भारतातून प्रक्षेपित करणे शक्य  नसते अशा उपग्रहांचे प्रक्षेपण ESA  च्या Ariane-5 या प्रक्षेपण वाहनाद्वारे दक्षिण अमेरिकेतील फ्रेंच गयाना  येथील kourou  या प्रक्षेपण तळावरून केले जाते.

Contact Us

  Enquire Now