चीन ठरेल जगातील पहिला स्वच्छ अणुभट्टी सक्रिय करणारा देश
- चिनी सरकारच्या शास्त्रज्ञांनी थंड होण्यासाठी पाणी न लागणाऱ्या एका प्रायोगिक अणुभट्टीच्या स्थापनेची घोषणा केली आहे.
- ही अणुभट्टी युरेनियमऐवजी लिक्विड थोरियमवर कार्य करेल तसेच पारंपरिक अणुभट्ट्यांपेक्षा ही सुरक्षित असेल.
ठळक मुद्दे :
१) ह्या प्रोटोटाईप अणुभट्टीचे काम ऑगस्टमध्ये पूर्ण होऊन त्याची पहिली चाचणी सप्टेंबरमध्ये होईल अशी अपेक्षा आहे.
२) या चाचणीमुळे पहिल्या व्यावसायिक अणुभट्टीच्या बांधकामाचा मार्ग मोकळा होईल.
३) या अणुभट्टीस पाण्याची आवश्यकता नसल्याने वाळवंटी प्रदेशातही कार्य करण्यास ही सक्षम असेल.
४) पहिल्या अणुभट्टीच्या स्थानासाठी वुवेईच्या वाळवंटी शहराची निवड केली असून चीन सरकारची पश्चिम चीनची मैदाने तसेच वाळवंटी प्रदेशात अजून अशा अणुभट्ट्या स्थापनेची योजना आहे.
५) शांघाय इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड फिजिक्सच्या एका टीमने ही प्रोटोटाइप अणुभट्टी विकसित केली आहे.
मोल्टन – साल्ट अणुभट्टी :
१) पारंपरिक अणुभट्ट्यांमध्ये वापरलेले इंधन रौडऐवजी यात मोल्टन साल्टचा वापर केला आहे.
२) ही अणुभट्टी ६०० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानावरील अणुभट्टीच्या कक्षात जाण्यापूर्वी थोरियमला फ्लोराइड साल्टमध्ये विरघळण्याचे काम करते.
३) यात थोरियमला हवेच्या संपर्कात येताच पटकन थंड व घट्ट करून इन्सुलेट केले जाते, ज्यामुळे संभाव्य गळती होऊन जास्तीचा किरणोत्सार टाळला जातो.
थोरियम :
१) किरणोत्सर्गी, चंदेरी धातू असून त्यास नॉर्स देव ‘थंडर थॉरचे’ नाव देण्यात आले आहे.
२) युरेनियमपेक्षा अधिक मुबलक आणि स्वस्त असूनही अण्वस्त्रे तयार करण्यासाठी याचा सहज वापर करता येत नाही.
३) भारतात केरळमधील मोनाझाइट वाळूमध्ये थोरियमचे प्रमाण जास्त आढळते.
४) भारतातील साठे : केरळ, झारखंड, बिहार, तमिळनाडू, राजस्थान
भारतातील अणुऊर्जा प्रकल्प :
- भारतात ७ अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये ६७८० मेगावॅट क्षमतेसह २२ अणुभट्ट्या कार्यरत आहेत.
क्र. | अणुऊर्जा प्रकल्प | राज्य |
१ | कैगा | कर्नाटक |
२ | काक्रापार | गुजरात |
३ | कुडनकुलम् | तमिळनाडू |
४ | कल्पकम् | तमिळनाडू |
५ | नरोरा | उत्तरप्रदेश |
६ | तारापूर | महाराष्ट्र |
७ | रावतभाटा | राजस्थान |