चीनचा पवित्रा आणि एलाॅन
मस्क यांच्या ट्विटमुळे बिटकाॅइन किमतीत वेगाने घसरण
- क्रिप्टो करन्सीमधील लोकप्रिय डिजिटल चलन असलेल्या बिटकॉइनची किंमत गेल्या काही महिन्यांपासून घसरत आहे. त्याला प्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क आणि चीनचा क्रिप्टो करन्सीबद्दलचा पवित्रा कारणीभूत ठरत आहे.
- क्रिप्टोकरन्सी म्हणजे आभासी चलन. चलनी नोटांना पर्याय असणारी एक व्हर्च्युअल वा डिजिटल करन्सी. कोणत्याही देशाचे सरकार किंवा बँक हे चलन छापत नाही. क्रिप्टोकरन्सी फक्त ऑनलाईन उपलब्ध असते.
- गुंतवणूकदारांसाठी (क्रिप्टो करन्सी) बिटकॉईन हा सर्वात आकर्षक पर्याय आहे. केवळ एका दिवसात त्याचा भाव 14 टक्क्यांनी घसरला. एलॉन मस्क यांची डिजिटल चलनाबद्दलच्या धरसोडीची वृत्ती आणि चीनने क्रिप्टो व्यवहारांवर घातलेली बंदी ही बिटकॉइर्नच्या घसरणीला कारणीभूत ठरली.
- स्पेस एक्स आणि टेस्ला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलाॅन मस्क यांनी बिटकॉइन व्यवहारात ‘विकत घ्या आणि बुडवा’ ही वृत्ती वाढल्याचे चिन्ह दिसत आहे. गुंतवणूकदार निराश झाले आहेत, असे ट्विट केले होते. त्यामुळे बिटकॉइन किंमतीत घसरण झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. बिटकॉइन पर्यावरणपूरक नसल्याचेही मस्क म्हणाले होते. यामुळे डिजिटल गुंतवणूकदारांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
- चीनने क्रिप्टो व्यवहारांवर बंदी घालून परकीय चलन वेबसाईट्ही बंद केली आहे. कारण चीनमधील तीन प्रमुख औद्योगिक कंपन्यांनी क्रिप्टो करन्सीमुळे लोकांच्या संपत्तीचा सुरक्षेला धोका आहे, त्याचप्रमाणे सर्वसामान्य अर्थव्यवस्था विस्कळित होणार असल्याचेही एका संयुक्त निवेदनात स्पष्ट केले आहे.
बिटकॉइन म्हणजे काय?
- ही एक प्रकारची क्रिप्टो करन्सी आहे.
- हे रुपया डॉलर किंवा इतर कुठलेही चलनाप्रमाणे एक चलन असते. फक्त ते ऑनलाइन असते आणि एका कॉम्प्युटर कोडद्वारे एनक्रिप्टेड केलेले असते.
- त्याचबरोबर फक्त दोन अकाउंट दरम्यान हे व्यवहार होतात.
- बिटकॉइनचे दोन प्रकार पडतात –
-
- क्लासिक बिटकॉईन
- हार्ड फॉर्क बिटकॉईन
- पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून याचा उपयोग होऊ शकतो.
- बिटकॉइनचे व्यवहार कमीत कमी वेळात आणि वर्षाचे 365 दिवस 24 तास आपण करू शकतो. बँकांच्या सुट्ट्या, नोकरशाही यांचा परिणाम या व्यवहारांवर होत नाही.
- भारतातही रिझर्व्ह बँक याबाबत सकारात्मक आहे. पण ही तरतूद ट्रेंडिंगसाठी नाही तर ऑनलाइन व्यवहारांसाठी आहे. त्यासाठी ब्लॉकचेन सुरक्षित प्रणाली समजली जाते.