चिल्का सरोवरात आढळली मृत इरावदी डॉल्फिन

चिल्का सरोवरात आढळली मृत इरावदी डॉल्फिन

  • भारतातील चिल्का सरोवरात मृत इरावदी डॉल्फिन आढळून आली. ही ओदिशातील गेल्या आठ महिन्यांतील आठवी मृत डॉल्फिन आहे.

इरावदी डॉल्फिन (Orcaella brevirostris):

  • आढळ : ही डॉल्फिन दक्षिण आणि आग्नेय आशियातील किनारपट्टी भागात तसेच इरावदी (म्यानमार), महाकाम (इंडोनेशियन बोर्निओ) आणि मेकांग (चीन) या तीन नद्यांमध्ये आढळून येते.

संरक्षण :

अ) भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२: अनुसूची I

ब) इंटरनॅशनल युनियन फॉर द कॉन्झर्वेशन ऑफ नेचर (आययुसीएन): लाल यादी – लुप्तप्राय प्रजाती (Endangered species)

  • ओदिशातील चिल्का सरोवर तसेच दक्षिण थायलंडमधील सोंगखला तलावात यांची संख्या जास्त प्रमाणात आढळते.
  • भारतात २०२० मध्ये १४६ असलेली इरावदी डॉल्फिन्सची संख्या एप्रिल २०२१ मध्ये १६२ इतकी झाली आहे.
  • चिल्का सरोवरातील सातपाडा बीचला या डॉल्फिन्सचे घर म्हणून संबोधले जाते.

 

चिल्का सरोवर :

 

  • चिल्का भारतातील सर्वात मोठे तर जगातील दुसरे मोठे समुद्री सरोवर आहे.
  • हे सरोवर ७० किलोमीटर्स लांब, ३० किमी रुंद व साधारणत: २ मीटर खोल आहे.
  • १९८१ मध्ये या सरोवरास रामसार करारानुसार, भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय पाणथळ ठिकाण म्हणून घोषित करण्यात आले.
  • चिल्का सरोवरातील १६ चौरस किमीवर पसरलेल्या नलबाण बेटास १९८७ साली पक्षी अभयारण्याचा दर्जा देण्यात आला.
  • भारतीय उपखंडातील स्थलांतरित पक्ष्यांसाठी हे सर्वात मोठे ठिकाण असून अनेक संकटग्रस्त वनस्पती व प्राण्यांचे माहेरघरही आहे.
  • या सरोवरातील एका बेटावर काळजाईचे मंदिर आहे.
  • चिल्का सरोवर हे गोदावरी व महानदीच्या त्रिभुज प्रदेशांदरम्यान स्थित आहे.

Contact Us

    Enquire Now