गगनयान अभियान
- नुकतेच मानवी गगनयान मोहीम २०२३मध्ये प्रक्षेपित केली जाईल असे केंद्रीय अणुऊर्जा आणि अवकाशमंत्र्यांनी सांगितले.
- देशाचे पहिले अवकाश स्थानक २०३० पर्यंत तयार होण्याची शक्यता आहे.
मिशन गगनयान :
- भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)ची मानवी अवकाश मोहीम
- २०१८च्या स्वातंत्र्यदिनी भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०२२ पर्यंत भारतीय अंतराळवीर स्वबळावर अवकाशात पाठवण्याची घोषणा केली होती.
- डिसेंबर २०१८ मध्ये भारताच्या पहिल्या मानवी अवकाश मोहिमेस मंजुरी देण्यात आली.
- गगन अभियानामध्ये तीन प्रक्षेपणे केल्या जातील.
- पहिल्या दोन चाचण्यांमध्ये मानव नसेल. पहिली चाचणी २०२२ वर्षाच्या उत्तरार्धात केली जाणार असून त्यामध्ये अवकाश यानाची तपासणी केली जाईल.
- दुसऱ्या चाचणीमध्ये ‘व्योममित्रा’ नावाचे रोबोट पाठवल्या जाणार आहे.
- तर २०२३ मध्ये होणाऱ्या तिसऱ्या प्रक्षेपणामध्ये तीन भारतीय अंतराळवीरांना (ज्यामध्ये एका महिलेचा समावेश असेल) पृथ्वीपासून ३०० ते ४०० किलोमीटर्स उंचीवर पाच ते सात दिवसांसाठी निम्न पृथ्वी कक्षेमध्ये (LEO) ठेवले जाईल.
- असे केल्यास भारत स्वबळावर अवकाशात मानव पाठवणारा रशिया, अमेरिका आणि चीननंतर चौथा देश असेल.
- गगनयान अवकाशात पाठवण्यासाठी जीएसएलव्ही एमके-३ हे प्रक्षेपक वाहन वापरण्यात येणार आहे.
- निवडण्यात आलेल्या भारतीय अंतराळवीरांचे रशिया येथे प्रशिक्षण सुरू झाले आहे. तसेच अंतराळवीरांच्या वैद्यकीय गरजा भागवण्यासाठी फ्रान्स मदत करणार आहे.
- गगनयान मोहिमेचे प्रकल्प संचालक : आर. हटन
- गगनयान तसेच भविष्यातील मानवी अवकाश मोहिमांसाठी सर्व गरजा भागवण्यासाठी कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात चल्लाकेरे येथे ह्यूमन स्पेस फ्लाईट सेंटर उभारण्यात येत आहे.
आगामी इतर अभियाने :
- शुक्रयान : शुक्र ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी भारताची पहिली मोहीम
- आदित्य एल-१ : सूर्याच्या कोरोनाचा अभ्यास करण्यासाठीचे भारताचे पहिले सौर मिशन