ख्रिस्तियानो रोनाल्डोचा सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
- फूटबॉलमधील स्टार खेळाडू म्हणून ओळखला जाणारा ख्रिस्तियानो रोनाल्डोने पोर्तुगाल विरुद्ध आयर्लंड सामन्यात दोन गोल करत
आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक गोल करण्याचा गिनीझ वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.
- रोनाल्डोने या १८०व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात १११वा गोल केला.
- त्याच्या या कामगिरीने त्याने इराणचा फूटबॉल खेळाडू अली डाएईला मागे टाकले आहे.
- अलीने १४९ सामन्यात १०९ गोल केले होते.
महत्त्वाचे
- रोनाल्डो व अली ह्या दोनच खेळाडूंनी त्यांच्या देशासाठी फूटबॉलमध्ये १०० हून अधिक गोल केले आहेत.
रोनाल्डोची क्लब स्तरावरील कामगिरी:
- त्याने चॅम्पियन्स लीगमध्येही सर्वाधिक गोल केले असून त्याच्या नावावर १३४ गोल आहेत.
- तर युरोपियन लीगमध्येही सर्वाधिक १४ गोल्स रोनाल्डोने केले आहेत.
रोनाल्डोची सुरुवात
-
- २००३ मध्ये मँचेस्टर युनायटेडसह त्याच्या व्यावसायिक फुटबॉल कारकीर्दीची सुरुवात झाली.
- २००३ ते २००९ दरम्यान रोनाल्डोने युनायटेड संघासोबत आठ महत्त्वाचे पुरस्कार जिंकले होते.
- २००९ ते २०१८ पर्यंत स्पेनचा दिग्गज क्लब रियल माद्रिदकडून खेळत होता.
- २०१८ ते २०२१ दरम्यान जुव्हेंटस क्लबकडून खेळत असताना आता पुन्हा मँचेस्टर युनायटेड क्लबकडून खेळण्याचा निर्णय त्याने घेतला आहे.
सन्मान :
-
- २०२१ – सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करण्याचा गिनीझ वर्ल्ड रेकॉर्ड
- २००८, २०१३, २०१४, २०१६, २०१७ – फिफा बॅलोन डीओर
- २००७-०८, २०१०-११, २०१३-१४, २०१४-१५ : युरोपियन गोल्डन शूज
- २०१६, २०१७ : सर्वोत्कृष्ट फिफा पुरुष खेळाडू
- २०१८ : फिफा वर्ल्ड प्लेअर ऑफ द इयर
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणारे खेळाडू
क्रमवारी | खेळाडू | देश | गोल | सामने |
१ | ख्रिस्तियानो रोनाल्डो | पोर्तुगाल | १११ | १८० |
२ | अली डाएई | इराण | १०९ | १४९ |
३ | मुख्तार | मलेशिया | ८९ | १४२ |
९ | लिओनेल मेस्सी | अर्जेंटिना | ७६ | १४९ |
१३ | सुनील छेत्री | भारत | ७४ | ११८ |