क्युबा या देशाच्या शासनपदावर कॅस्ट्रोव्यतिरिक्त अन्य व्यक्ती
- क्यूबातील कम्युनिस्ट पक्षाचे नेते व क्यूबाचे माजी राष्ट्राध्यक्ष राऊल कॅस्ट्रो यांनी पक्षाच्या प्रथम सचिवपदाचा राजीनामा दिला.
- क्युबाच्या अध्यक्षपदावरून ते २०१८ मध्येच दूर झाले होते. पण तरीही कम्युनिस्ट पक्षाचे प्रथम सचिव या नात्याने ते क्यूबा देशाचे सर्वेसर्वा होते.
- १९५९ नंतर प्रथमच क्यूबाच्या शासकपदावर कॅस्ट्रोव्यतिरिक्त अन्य व्यक्ती विराजमान होत आहे.
- प्रथम देशाचा कारभार ‘कॅस्ट्रोविना’ चालणार आहे.
- माझे कर्तव्य पूर्ण केल्याचे समाधान आणि पुढील पिढीवर विश्वास आहे असे मोजक्या शब्दात भाषण करत त्यांनी राजीनामा दिला.
- पक्षाचे अध्यक्ष मिग्वेल डॅझकॅनेल यांच्याकडे क्यूबा देशाची सूत्रे जाण्याची शक्यता आहे.
- राऊल कॅस्ट्रो यांना कधी काळी क्यूबाचे डेंग ज्वायफंग बनायचे होते.
- क्यूबाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष मिग्युएल दियाझ कानेल यांची क्यूबन राजकारणावर राऊल कॅस्ट्रो यांच्याइतकी पकड नाही.