कैलास सत्यार्थी यांची एसडीजी अधिवक्ता म्हणून नियुक्ती
- संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या ७६व्या महासभेपूर्वी १७ शाश्वत विकास लक्ष्यांसाठी (एसडीजी) चार नवीन एसडीजी अधिवक्त्यांची नियुक्ती केली आहे.
एसडीजी अधिवक्ता यादीत पुढील व्यक्तींचा समावेश आहे.
अ) कैलास सत्यार्थी : शांततेसाठी नोबेल पारितोषिक विजेते (२०१४)
ब) व्हॅलेंटिना मुनोझ रबनाल : सर्वात तरुण अधिवक्ता (१९ वर्षीय); स्टेम कार्यकर्ता; तिचा मूळ देश चिली येथे प्रथम कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण लिहिण्यास सहाय्य केले.
क) ब्रँड स्मिथ : मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष, डिजिटल कौशल्यातील तफावत कमी करणे तसेच पर्यावरण स्थिरतेवर भर.
ड) ब्लॅकपिंक : जागतिक स्तरावर ६५ दशलक्षांपेक्षा अधिक फॉलोअर्स असलेला पॉप कलाकार; पृथ्वीच्या रक्षणाकरिता हवामान कृती करण्यास तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी COP-२६ मध्ये व्यस्त.
उद्दिष्ट :
- एसडीजी अधिवक्ता हवामान कृती, डिजिटल तफावत, लिंग समानता व बाल हक्कांचा प्रसार या प्रमुख मुद्द्यांवर काम करतील.
- २०३० पर्यंत शाश्वत विकास ध्येये साध्य करण्यासाठी हे अधिवक्ता त्यांच्या प्रमुख कार्यक्षेत्रांचा वापर करतील.
- २०२५ पर्यंत जगभरातून बालमजुरीचे उच्चाटन करण्याच्या ध्येयासाठी हे योग्य भूमिका बजावतील.
कैलाश सत्यार्थी
- चार दशकांहून अधिक काळ बाल हक्कांसाठी लढणारे कार्यकर्ते.
- त्यांनी सुरू केलेल्या ‘बचपन बचाओ आंदोलना’द्वारे एक लाखांपेक्षा जास्त मुलांना बालकामगार, गुलामगिरी, तस्करी व इतर प्रकारच्या शोषणापासून वाचविण्यात आले आहे.
- त्यांच्या नेतृत्वाखाली २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या इतिहासातील ‘आयएलओ कन्व्हेन्शन- १८२’ हे टोंगा या १८७व्या देशाच्या स्वाक्षरीसह एकमेव सार्वत्रिक मान्यताप्राप्त अधिवेशन बनले.
- जगभरात शिक्षणाचा हक्क प्रदान करणाऱ्या ग्लोबल कॅम्पेन फॉर एज्युकेशन या संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष.
- कोरोना संकटात दिलेल्या आर्थिक अनुदानामध्ये मुलांना योग्य वाटा मिळावा यासाठी नोबेल पारितोषिक विजेते आणि जागतिक नेत्यांना एकत्र करून सत्यार्थी ‘फेअर शेअर फॉर चिल्ड्रेन’ नावाची मोहीम चालवत आहेत.
इतर
- २०१९ मध्ये दिया मिर्झा (संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या सदिच्छादूत) यांची एसडीजी अधिवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- संयुक्त राष्ट्र संघाद्वारे २०२१ हे वर्ष आंतरराष्ट्रीय बालकामगार निर्मूलन वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे.