केन कॅटरमोल

केन कॅटरमोल

 • जन्म: १९२२
 • निधन: जुलै २०२१
 • प्रा. केन यांच्यामुळे ॲनालॉग संदेशाचे डिजिटल संदेशात रूपांतर करणे शक्य झाले.
 • ते सफोक येथील युनिव्हर्सिटी इसेक्स या संस्थेत प्राध्यापक म्हणून कार्यरत होते; येथे ते संशोधन विभागात संशोधन अध्यापन करत होते.
 • १९६९ मध्ये त्यांनी प्रिन्सिपल्स ऑफ कोड मोड्यूलेशन हे पुस्तक लिहिले.
 • आज घड्याळे, मोबाईल यांसारख्या डिजिटल वस्तू आपण वापरत आहोत ते केन यांनी विकसित केलेल्या पल्स कोड मोड्यूलेशन या ॲनालॉग संदेशांचे डिजिटल संदेशात रूपांतर करण्याच्या पद्धतीमुळेच.
 • या पद्धतीमुळे माहिती साठवणे किंवा पाठवणे अधिक सहज शक्य झाले.
 • प्रत्यक्षात मोबाईल फोन निर्मितीचे श्रेय मार्टिन कूपर (१९७१) किंवा ‘एसएमएस’ लघुसंदेशाचे जनक नील पॅपवर्थ (१९९२) यांना मानले जात असले, तरीही या साऱ्याचा सैद्धांतिक पाया केन यांच्या कार्यामुळे रचला गेला.
 • केन यांनी रॉयल इलेक्ट्रिकल ॲण्ड मेकॅनिकल इंजिनिअर्स या संस्थेत काम केले व नंतर संशोधन व दूरसंदेशवहन उद्योगात कार्यरत होते.
 • सरकारला अनेक वर्षे संदेशवहन धोरणाबाबत सल्ला देण्याचे कामही त्यांनी केले.
 • १९९० मध्ये ते निवृत्त झाले.
 • त्यांना पियानो वाजविण्यास त्याचबरोबर बागकामाची आवड होती.
 • १९९६ मध्ये त्यांना इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्समार्फत जे. जे. थॉमसन पदक देऊन गौरविण्यात आले.
 • त्याचबरोबर इसेक्स विद्यापीठातील एका विभागाला त्यांचे नाव देण्यात आले आहे.

Contact Us

  Enquire Now