कन्या वन समृद्धी योजना
१) कृषिप्रधान असणाऱ्या आपल्या देशात ५० टक्क्यांपेक्षा जास्त लोक खेड्यात राहतात.
२) सामाजिक वनीकरण विभागातर्फे ही योजना राबवण्यात येत आहे.
३) उद्देश
- ज्या कुटुंबात मुलगी जन्माला येईल अशा शेतकरी दाम्पत्याला १० रोपे विनामूल्य देऊन प्रोत्साहित करणे.
- वनक्षेत्राव्यतिरिक्त जास्तीत जास्त वनेतर क्षेत्र वृक्षलागवडीखाली आणणे.
- मुलगा आणि मुलगी समान असून महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण यासाठी सामाजिक संदेश देणे.
- मुलींच्या घटत्या संख्येवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवणे.
४) ज्या शेतकरी दामप्त्यास मुलगी होते त्यांना सामाजिक वनीकरणाच्या रोपवाटिकेतून १० रोपे ग्रामपंचायतीमार्फत विनामूल्य दिली जातात. त्यामध्ये ५ रोपे सागाची/सागवान जड्या, २ रोपे आंबा, १ फणस, १ जांभूळ आणि १ चिंच अशी रोपे असतात. या झाडापासून मिळणारे सर्व उत्पन्न मुलीचा कौशल्य विकास, उच्च शिक्षण आणि रोजगार मिळवणे व मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या इच्छेनुसार वापरण्यास मुभा आहे.
५) लाभार्थी : ही योजना ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबात जास्तीत जास्त दोन मुली जन्माला येतात व त्यानंतर अपत्यांची संख्या नियंत्रित केली जाते. एक मुलगा किंवा एक मुलगी अथवा दोन मुली ज्या कुटुंबात असतील ते लाभार्थी
६) या शेतकऱ्यांना १ जुलै या एकाच दिवशी रोपांचे वाटप ग्रामपंचायतीमार्फत करावयाचे आहे.
- पुणे जिल्ह्यातील रानमळा, ता. खेड या गावातील ग्रामस्थाकडून जन्म, विवाह आणि मृत्यू अशा अविस्मरणीय प्रसंगाच्या निमित्ताने लोकसहभागातून वृक्षलागवडीचा कार्यक्रम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हाती घेतलेला आहे. या उपक्रमातून आपल्या प्रिय व्यक्तीची आठवण दीर्घकाळासाठी जपली जाते.
- या रानमळा गावाच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने ‘वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना’ या योजनेअंतर्गत ग्रामीण भागासाठी ग्रामविकास विभागाकडून तर शहरी भागासाठी नगर विकास विभागाकडून निर्णय निर्गमित केला आहे.
- या योजनेअंतर्गत
१) शुभेच्छा वृक्ष – जन्माला येणाऱ्या बालकांच्या जन्माचे स्वागत संबंधित कुटुंबाला फळझाडांची रोपे देऊन केले जाते.
२) शुभमंगल वृक्ष – गावात विवाह होणाऱ्या तरुणास फळझाडाची रोपे देऊन शुभाशीर्वाद देणे.
३) आनंद वृक्ष – दहावी/बारावी उत्तीर्ण होणाऱ्या, गावातील नोकरी मिळवणाऱ्या तरुण/तरुणींना आणि गावातील विविध निवडणुकांत विजयी होणाऱ्या उमेदवारांना
४) माहेरची साडी – सासरी गेलेल्या विवाहित कन्यांच्या माहेरच्या लोकांना फळझाडे
५) स्मृती वृक्ष – ज्या व्यक्तीचे निधन होते त्या व्यक्तीच्या कुटुंबाला फळझाडांचे रोप देऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात येते.