एस. एस. हकीम

एस. एस. हकीम

 •  पूर्ण नाव: सय्यद शाहिद हकीम
 • जन्म: २३ जून १९३९ (हैद्राबाद)
 • निधन: २२ ऑगस्ट २०२१ (वय- ८२ वर्षे)
 • हकीम साहब म्हणून त्यांची ओळख होती.
 • त्यांचे वडील अब्दुल रहीम हेदेखील फुटबाॅल संघाचे प्रशिक्षक होते.
 • भारतीय फुटबॉलपटू, प्रशिक्षक आणि रेफरी म्हणून त्यांनी कार्य केले होते.

कारकीर्द:

 • १९६० च्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचे सय्यद हकीम यांनी प्रतिनिधित्व केले होते; मात्र त्यांना एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
 • १९८२ च्या आशियाई क्रिकेट स्पर्धेत पी. के. बॅनर्जी यांच्यासमवेत सहाय्यक प्रशिक्षकपदाचा कार्यभार सांभाळला होता.
 • मेर्डेक येथील एका स्पर्धेत मुख्य प्रशिक्षकपदाची भूमिका बजावली.
 • ३० मे १९८९ ते १० फेब्रुवारी १९९२ दरम्यान औरंगाबाद विद्यापीठ परिसरातील साई (स्पोर्टस अॉथॉरिटी ऑफ इंडिया)च्या पश्चिम विभागीय केंद्रात संचालक म्हणून कार्यरत होते, तेव्हा त्यांनी या केंद्राच्या विकासासाठी निधी आणला होता.
 • सलग १३ आंतरराष्ट्रीय सामन्यात रेफरी म्हणूनही त्यांनी काम केले.

पुरस्कार:

 • द्रोणाचार्य पुरस्कार
 • ध्यानचंद पुरस्कार (२०१७)

Contact Us

  Enquire Now