एम्मा राडुकानू वयाच्या १८व्या जिंकले ग्रँड स्लॅम स्पर्धेचे जेतेपद
- ब्रिटनची एम्मा राडुकानू टेनिस युवराज्ञी वयाच्या १८व्या वर्षीच जिंकले अमेरिकन ग्रँड स्लॅम स्पर्धेचे अजिंक्यपद
- १९ वर्षीय लैला फर्नांडिसवर सामन्यातील एकही सेट न गमावता विजय मिळविला.
- तब्बल ४४ वर्षांनी ‘ग्रँड स्लॅम’ जेतेपद जिंकून एम्माने ब्रिटनच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
- ब्रिटनने पहिल्यांदा १९७७ मध्ये व्हर्जिनिया वेड हिने विम्बल्डन स्पर्धा जिंकली होती.
- अवघ्या १८व्या वर्षी जेतेपद पटकावणारी एम्मा ‘ग्रँड स्लॅम’ स्पर्धेच्या इतिहासातील दुसरी सर्वात तरुण स्पर्धक ठरली आहे.
- १७व्या वर्षी जेतेपद पटकावण्याचा यापूर्वी हा पराक्रम २००४ मध्ये रशियाच्या मारिया शरोपोवने केला होता.
- पदार्पणातच अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा जिंकणारी रॅडूकानू ही केवळ दुसरी टेनिसपटू ठरली. याआधी कॅनडाच्या बियांका आद्रेस्कुने २०१९ मध्ये पहिल्यांदा ही कामगिरी केली होती.
- रॅडुकानूने तिच्या दुसऱ्याच ग्रॅडस्लॅम स्पर्धेत जेतेपद पटकवण्याची किमया साधली. ही कामगिरी करणारी ती पहिलीच टेनिसपटू ठरली.
- याआधी ती विम्बल्डनमध्ये खेळली होती.
- या स्पर्धेअगोदर राडुकानूचे मानांकन १५० वे होते.
- महिला टेनिस विश्वाला थक्क करणाऱ्या राडुकानूने २०१९ मध्ये पुण्यातील डेक्कन जिमखान्यावर झालेल्या आयटीएफ टेनिस स्पर्धेचे विजेतेपद तिने मिळविले होते.
- त्याचवर्षी ती सोलापूर येथे झालेल्या आयटीएफ स्पर्धेतही खेळली होती.