एअर इंडिया पुन्हा टाटांकडे
- सतत तोट्यात असलेली ‘एअर इंडिया’ ही सरकारी हवाई वाहतूक कंपनी ‘टाटा सन्स’ ने १८ हजार कोटी रुपयांना खरेदी केली.
- एअर इंडियाच्या सर्व मालमत्ता आणि कंपनीवर असलेल्या सुमारे १५ हजार ३०० कोटींच्या कर्जासह ही बोली टाटा सन्सने लावली.
- प्रक्रियेनुसार ४ महिन्यांनतर ही कंपनी टाटा सन्सकडे हस्तांतरित होईल.
- पहिल्या वर्षी सर्व कर्मचाऱ्यांचा पगार कायम ठेवला जाईल व दुसऱ्या वर्षापासून स्वेच्छानिवृत्तीयोजन सुरू होईल.
- टाटा समूहाचा सध्या ‘एअर एशिआ’ आणि ‘विस्तारा’ या कंपन्यांत मोठावात आहे.
मालकीचा प्रवास
- १५ ऑक्टोबर १९३२ – जहाँगीर रतनजी दादाभॉय म्हणजे जेआरडी टाटा यांनी ‘टाटा एअरलाइन्स’ या विमान कंपनीची स्थापना
- १७ ऑक्टोबर १९३२ – कराची ते मुंबई असे पहिले उड्डाण या विमानाचे वैमानिक जे.आर.डी. टाटा होते.
- १९४६ – ‘टाटा सन्स’ने या कंपनीचे विभाजन करत एअर इंडिया आणि एअर इंडिया इंटरनॅशनल या दोन कंपन्या स्थापन केल्या.
- १९५३ – एअर इंडियाचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.