ऊर्जा सुरक्षा : अणु ऊर्जा
- भारतात ऊर्जानिर्मितीमध्ये कोळशाचा सर्वाधिक ५५ टक्के, तर अणुऊर्जा व पुनर्नवीकरणीय ऊर्जेचा वाटा अनुक्रमे ३ टक्के व २० टक्के इतका आहे.
- सध्या भारतात २२ कार्यरत अणुभट्ट्या असून त्यांची एकूण स्थापित क्षमता ७४८० मेगावॅट इतकी आहे.
- भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक होमी भाभा यांनी भारतात त्रिस्तरीय अणुऊर्जा निर्मिती कार्यक्रमाचा आराखडा आखला.
- भारत जगातील तिसरा मोठा थोरियमचा साठा असलेला देश आहे.
- युरेनियम – २३५ पासून अणुऊर्जा निर्मिती केली जाते.
- भारताचा दरडोई विजेचा उपभोग कॅनडा, अमेरिका, चीन इ. देशांच्या तुलनेत कमी असून ११८१ किलोवॅट इतका आहे.
भारतातील अणुऊर्जा निर्मिती केंद्रे :
अणुऊर्जा केंद्र |
राज्य | क्षमता (mw) |
कैगा |
कर्नाटक |
८८० |
काक्रापार |
गुजरात |
११४० |
कुडनकुलम |
तमिळनाडू |
२००० |
कल्पकम |
तमिळनाडू |
४४० |
नरोरा |
उत्तरप्रदेश |
४४० |
रावतभाटा |
राजस्थान |
११८० |
तारापूर |
महाराष्ट्र |
१४०० |
एकूण |
७४८० |