इस्रोचा नवीन पृथ्वी निरीक्षण उपग्रह – EOS-03
- राज्यसभेमध्ये प्रश्नाचे उत्तर देताना विज्ञान व तंत्रज्ञानाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी पृथ्वी निरीक्षण उपग्रह EOS-३ हा या वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीत प्रक्षेपित केला जाईल असे प्रतिपादन केले.
- कोविडमुळे बंद असलेले भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) काम पुन्हा सुरू करण्यात येईल.
- मागील वर्षी ७ नोव्हेंबरला असाच एक उपग्रह EOS-0१ पीएसएलव्ही – C ४९ प्रक्षेपकाद्वारे निम्न कक्षेत(LEO) प्रक्षेपित केला गेला होता.
- EOS-0१ चे अगोदरचे नाव RISAT-२BR२ असे होते.
- EOS-0१ आणि EOS-0३ हे दोन्ही रडार इमेजिंग उपग्रह असून पृथ्वी निरीक्षणाचे काम करतील. यांना RISAT- २B आणि RISAT- २BR१ हे पूर्वी प्रक्षेपित केलेले रडार इमेजिंग उपग्रह सहाय्य करतील.
- पृथ्वी निरीक्षण उपग्रह हे सुदूर संवेदन उपग्रह असून ते २००० किमी पर्यंतच्या कमी उंचीच्या कक्षामध्ये (Low Earth Orbit) प्रक्षेपित केल्या जातात.
- कमी उंचीवर असल्याने त्यांना पृथ्वीचे निरीक्षण करणे सोपे असते. तसेच उत्तर-दक्षिण अशा ध्रुवीय कक्षेमध्ये असल्याने एका दिवसामध्ये पृथ्वीच्या १६ प्रदक्षिणा ते घालतात. त्यामुळे संपूर्ण भारतावरून किमान चार ते पाच वेळा त्यांच्या प्रदक्षिणा होतील.
- कृषी, पीक, नैसर्गिक संसाधने, वने इत्यादी बाबींचे रिअल टाईम निरीक्षण करण्यास हे उपग्रह सक्षम असतात.
- रडार इमेजिंग उपग्रहांना खराब वातावरण, कमी सूर्यप्रकाश यामुळे अडथळे निर्माण होत नाहीत.
- इस्रोने या अगोदर RESOURCESAT- 2, 2A, CARTOSAT-1, 2, 2A, 2B, RISAT-1 and 2, OCEANSAT-2, Megha-Tropiques, SARAL and SCATSAT-1, INSAT-3DR, 3D अशा अनेक पृथ्वी निरीक्षण उपग्रहांचे प्रक्षेपण केलेले आहे.
- CARTOSAT : कार्टोग्राफीसाठी म्हणजे नकाशे बनवण्यासाठी.
- RESOURCESAT : पृथ्वीवरील नैसर्गिक संसाधनांचे (Resources) निरीक्षण करण्यासाठी
- OCEANSAT : महासागराबद्दल अभ्यास करण्यासाठी
- Mega-Tropiques : हा भारत आणि फ्रान्स यांचा संयुक्त उपक्रम असून उष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्ये जलचक्र व वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी १२ ऑक्टोबर २०११ ला हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला होता.
- SARAL : Satellite with ARgos & ALtika हा सुद्धा इंडो-फ्रेंच संयुक्त उपक्रम असून महासागरांचा अभ्यास करण्यासाठी २५ फेब्रुवारी २०१३ ला प्रक्षेपित करण्यात आला होता.