इनजेन्युइटी हेलिकॉप्टरचे मंगळावर यशस्वीरीत्या उड्डाण
- परग्रहावर हेलिकॉप्टर फिरवणारा अमेरिका पहिला देश ठरला.
- अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था “नासाने” नवा इतिहास रचत इनजेन्युइटी हेलिकॉप्टर मंगळावरील विरल वातावरणात यशस्वीरित्या झेपावले.
- परग्रहावर अशा प्रकारचे हेलिकॉप्टर उड्डाण घडवून आणण्याची नासाची पहिलीच वेळ आहे.
- ही एक मोठी कामगिरी असून याला “राइट बंधू क्षण” असे संबोधण्यात आले.
- इनजेन्युइटी हेलिकॉप्टरने मंगळ ग्रहावरील जेजेरो क्रेटरमध्ये तयार करण्यात आलेल्या एका तात्पुरत्या हेलिपॅडवरून उड्डाण घेतले.
- नासाच्या या हेलिकॉप्टरने १.८ किलोच्या रोटरक्राप्टने चार कार्बन फायबर पातीच्या आधारे उड्डाण घेतले. पाती प्रति मिनिटाला २५०० वेळा फिरतात.
- पृथ्वीवरील हेलिकॉप्टरच्या पातीच्या रोटेटिंग वेगापेक्षा पाचपट अधिक आहे.
- मंगळावरील वातावरण पृथ्वीच्या तुलनेत १०० पट हलके असल्याने पातीचे वजन जास्त.
- प्रकल्प व्यवस्थापक मिमी आँग यांनी म्हटले हे माझे खरे स्वप्न होते ते पूर्ण झाले.
- नासाला यात ४० सेकंदात उड्डाण अपेक्षित होते. त्यात ते १० फुट म्हणजे ३ मीटर उंच उडावे, ३० सेकंद घिरट्या माराव्यात असे अपेक्षित होते. या हेलिकॉप्टरने पूर्ण केले.
- हे हेलिकॉप्टर बनविण्यास ६ वर्षे लागली.
- उंची १.६ फूट म्हणजे ०.५ मीटर त्यात बॅटरी, हिटर, संवेदक, टिश्यु बॉक्स यांचा वापर केला आहे.