इजिप्त – न्यू डेव्हलपमेंट बँकचा नवा सदस्य
- नुकताच इजिप्त हा देश ‘ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँके’चा चौथा नवा सदस्य बनला आहे.
- सप्टेंबर २०२१ मध्ये बांगलादेश,उरुग्वे आणि संयुक्त अरब अमिराती या तीन देशांनी ‘ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँके’च्या सदस्यत्वाचा स्वीकार केला होता.
ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँक:
- ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँक ही एक बहुपक्षीय बँक आहे जी ब्राझील, रशिया, चीन, भारत आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशांनी विकसनशील देशातील शाश्वत विकास आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी स्थापन केली.
- या बँकेच्या स्थापनेची कल्पना सर्वप्रथम भारताने २०१२ मध्ये दिल्ली येथे झालेल्या चौथ्या ब्रिक्स शिखर परिषदेत मांडली होती.
- स्थापना : जुलै २०१५
- मुख्यालय : शांघाय, चीन
- सदस्य (९): ब्रिक्स देश (ब्राझील, रशिया, चीन, भारत आणि दक्षिण आफ्रिका), बांगलादेश, उरुग्वे, संयुक्त अरब अमिराती आणि इजिप्त
ब्रिक्स संघटना :
- ‘BRIC’ हा शब्द २००१ मध्ये गोल्डमन सॅक्स ॲसेट मॅनेजमेंटचे तत्कालीन अध्यक्ष जिम ओ’नील यांनी त्यांच्या ‘बिल्डिंग बेटर ग्लोबल इकॉनॉमिक ब्रिक्स’ या प्रकाशनात तयार केल्याचे मानले जाते. पण, मूळ अहवालात रिसर्च असिस्टंट असलेल्या रूपा पुरुषोत्थमन यांनी ही संज्ञा प्रत्यक्षात आणली होती.
- २००८ साली ब्राझील, रशिया, चीन आणि भारत या राष्ट्रांचे परराष्ट्रमंत्री प्रथम एकत्र आले. त्यानंतर आलेल्या जागतिक मंदीच्या पाश्र्वभूमीवर ब्रिकला अधिक जवळ येण्याची निकड वाटली, म्हणून १६ जून २००९ रोजी चार देशांच्या राष्ट्रप्रमुखांची पहिली शिखर परिषद रशियातल्या एडातरीनबर्ग येथे संपन्न झाली.
- २०१० मध्ये दक्षिण आफ्रिका सदस्य झाल्याने ब्रिक (BRIC) नाव बदलून ब्रिक्स (BRICS) असे झाले.
- गटातील देशांची अर्थव्यवस्था वृद्धिंगत होण्यासाठी निधी उपलब्ध करणे, परस्परांतील आर्थिक सहकार्य वाढवणे, आर्थिक सुरक्षितता मजबूत करणे, इत्यादी या संघटनेची उद्दिष्ट व कार्ये आहेत.