इंद्र – 21 युद्ध सराव

इंद्र – 21 युद्ध सराव 

  • भारत आणि रशिया या दोन देशांतील 12 वा इंद्र-२१ हा संयुक्त लष्करी सराव 1 ते 13 ऑगस्ट 2021 दरम्यान रशियामधील व्होल्गोग्राड येथे पार पडला.
  • 2003 पासून भारत आणि रशियादरम्यान हा युद्ध सराव होतो, तर पहिला त्रिसेवा (लष्कर, नौदल आणि हवाई दल) सराव 2017 पासून सुरू झाला आहे.
  • आंतरराष्ट्रीय दहशतवादी गटांच्या कारवाया रोखण्यासाठी, दहशतवादविरोधी मोहिमांच्या परिचलनासाठी संयुक्त राष्ट्रांच्या नियमावलीनुसार हा युद्ध सराव पार पडला.
  • या युद्ध सरावात दोन्ही देशांतील 250 जवानांनी भाग घेतला होता.
  • इंद्र – 21 या युद्ध सरावामुळे भारत आणि रशिया या देशांच्या लष्करांमध्ये परस्परांवरील विश्वास दृढ होण्यास तसेच आकस्मिक प्रसंगी दोन्ही देशांच्या लष्करांमध्ये उत्तम सुसंवाद राखणे शक्य होईल.
  • भारत-रशिया दरम्यानच्या ‘इंद्र नेव्ही 21’ या सागरी सरावात भारतीय नौदलाच्या आयएनएस तबर या युद्धनौकेने भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

Contact Us

    Enquire Now