इंडो-थाय कोऑर्डिनेटेड पॅट्रोल (कॉर्पेट)

इंडो-थाय कोऑर्डिनेटेड पॅट्रोल (कॉर्पेट)

  • आवृत्ती – 31वी
  • ठिकाण – अंदमान सुमद्रात मलाक्का सामुद्रधुनीच्या जवळ
  • कालावधी – 9 ते 11 जून 2021
  • देश – भारत-थायलंड

सहभाग –

अ) भारतीय नौदलातील स्वदेशी बनावटीची गस्ती नौका आयएनएस शरयू

ब) थायलंडची क्रबी ही गस्ती नौका

क) दोन्ही देशांच्या नौदलातील डॉर्नियर सागरी गस्त विमाने

सुरुवात : दोन्ही नौदलांमार्फत 2005 पासून आंतरराष्ट्रीय सागरी सीमा रेषेलगत वर्षातून दोनदा आयोजन.

उद्दिष्ट : भारत आणि थायलंडमधील सागरी संबंधांची अंमलबजावणी करण्यासाठी तसेच हिंदी महासागरातील या महत्त्वपूर्ण भागास आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सुरक्षित ठेवणे.

भारताच्या दृष्टीने या नौदल सरावाचे महत्त्व

अ) केंद्र सरकारच्या ‘सागर व्हिजन’ (प्रदेशातील सर्वांची सुरक्षा आणि विकास)चा भाग म्हणून भारतीय नौसेना हिंदी महासागर प्रदेशातील विशेष आर्थिक क्षेत्रे द्विपक्षीय आणि बहुपक्षीय कवायती, समन्वयित टेहाळणी, मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण इ. उपक्रमांद्वारे या देशांसमवेत क्रियाशील सहभाग वाढवत आहे.

आंतरराष्ट्रीय महत्त्व : 

  • संयुक्त राष्ट्रसंघ संमत सागरी कायदा संकेत 1982 (UNCLOS) ची यशस्वी अंमलबजावणी करणे.
  • UNCLOS, 1982 (United Nations Convention on the law of the Sea)

अंमलबजावणी – 16 नोव्हेंबर 1992

नियम 

अ) नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण व संवर्धन

ब) सागरी वातावरणाचे संवर्धन

क) बेकायदेशीर, अनियंत्रित मासेमारीस प्रतिबंध

ड) दडपशाही व तस्करी रोखण्यासाठी माहितीची देवाणघेवाण 

इ) बेकायदेशीर कायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातून येणे

ई) समुद्रातील शोध आणि बचाव कार्ये

कायद्याची अंमलबजावणी करणारी संस्था आंतरराष्ट्रीय सागरी दळणवळण संस्था (International Maritime Organisation – IMO)

  • भारत आणि थायलंड दरम्यान होणारे सैन्य सराव :

अ) मैत्री – लष्करी

ब) सिटमेक्स (SITMEX) – नौदल (त्रिपक्षीय सराव – भारत, सिंगापूर, थायलंड)

क) सियाम भारत (SIAM BHARAT) – हवाई दल

ड) इंडो-थाई कॉरपॅट – नौदल

⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️

This will close in 20 seconds

Contact Us

    Enquire Now