आरबीआयकडून आर्थिक समावेशन निर्देशांक जाहीर
- देशातील वित्तीय समावेशनाचे प्रमाण मोजण्यासाठी आणि त्यात सुरू असणाऱ्या सुधारणांना जोखण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने वार्षिक वित्तीय समावेशकता निर्देशांकाची घोषणा केली.
- मार्च २०१७ अखेर ४३.४ अंश असलेली या निर्देशांकाचे पातळी मार्च २०२१ अखेर ५३.९ अंश नोंदविण्यात आली.
वित्तीय समावेशन निर्देशांकाविषयी (एफआय-निर्देशांक):
- दरवर्षी जुलै महिन्यात प्रकाशित केला जातो.
- या निर्देशांकासाठी कोणतेही आधारभूत वर्ष ठरविण्यात आलेले नाही.
- बँकिंग, गुंतवणूक, विमा, टपाल व निवृत्तीवेतन (पेन्शन) या क्षेत्रांचा तपशील समाविष्ट करून देशातील आर्थिक समावेशकतेचे आकलन याअंतर्गत केले जाईल.
- तसेच हा निर्देशांक तयार करताना सरकार आणि या क्षेत्रातील संबंधित नियामक लोकांची मतेही समाविष्ट केली आहेत.
- एफआय निर्देशांकाचे मूल्य ० ते १०० दरम्यान असून ० म्हणजे संपूर्ण आर्थिक असमावेशन, तर १०० म्हणजे संपूर्ण आर्थिक समावेशन दर्शविते.
- मापदंड: या निर्देशांकाचे पुढील ३ मापदंड असून त्याअंतर्गत ९७ संकेतांक आहेत:
क्रमांक | मापदंड | भार (%) |
१. | प्रवेश | ३५ |
२. | वापर | ४५ |
३. | गुणवत्ता | २० |
- महत्व:
- वित्तीय सेवा आणि साधनांचे सार्वत्रिकीकरण, सर्वांसाठी ती सहजसाध्य आहेत काय व त्यांचा वापर आणि सेवेची गुणवत्ता दर्शविणारा हा निर्देशांक आहे.
- आर्थिक साक्षरतेचे प्रमाण, ग्राहक संरक्षणाला असणारे महत्त्व तसेच सेवाविषयक असमानता आणि उणिवा यांसारख्या गुणात्मक पैलूंचे निर्देशांक मापनातील लक्षणीय स्थान ग्राहक हिताच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरेल.
- सेवा क्षेत्रात कार्यरत सर्व घटकांच्या एकत्रित प्रयत्नांचे परिणाम हा निर्देशांक दाखल.
- वित्तीय समावेशना संबंधित योजना:
क्रमांक | योजना | सुरुवात |
१. | प्रधानमंत्री जनधन योजना | १५ अॉगस्ट २०१४ |
२. | प्रधानमंत्री जीवन ज्योति बिमा योजना | २०१५ |
३. | प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना | २०१५ |
४. | अटल बिमा योजना | ९ मे २०१५ |
५. | प्रधानमंत्री मुद्रा योजना | ८ एप्रिल २०१५ |
६. | स्टँड अप इंडिया | ५ एप्रिल २०१५ |