आयआयएम अहमदाबाद देशातील सर्वोत्तम बिझनेस स्कूल
- नुकतेच १४ सप्टेंबरला प्रकाशित झालेल्या क्यूएस जागतिक एमबीए क्रमवारीमध्ये गुजरातमधील आयआयएम (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट) अहमदाबाद भारतातील सर्वोत्तम बिझनेस स्कूल ठरले आहे.
- अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेस हे जगातील सर्वोत्तम बिझनेस स्कूल ठरलेले असून पहिल्या क्रमांकावर आहे.
- पहिल्या ५० संस्थांमध्ये आयआयएम अहमदाबाद आणि आआयएम बेंगलोर हे अनुक्रमे ४६ व ५०व्या क्रमांकावर आहेत.
- पहिल्या तीन क्रमांकावरील शैक्षणिक संस्था एकट्या अमेरिकेतील आहेत.
क्र. | संस्था | देश |
१ | स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेस | स्टॅनफोर्ड, अमेरिका |
२ | हार्वर्ड बिझनेस स्कूल | बोस्टन, अमेरिका |
३ | पेन बिझनेस स्कूल | फिलाडेल्फिया, अमेरिका |
- आयआयएम कलकत्ता हे ७६व्या क्रमांकावर आहे.
- सदर क्रमवारी लावताना खालील निकषांचा आधार घेण्यात आला.
- रोजगार मिळण्याची क्षमता
- उद्योजकता
- गुंतवणुकीवर परतावा
- नेतृत्वगुण
- वर्ग आणि शिक्षकांची गुणवत्ता
- बिझनेसच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भारतातील सर्वोत्तम म्हणून ठरलेल्या संस्था खालीलप्रमाणे:
- उद्योग विश्लेषण (business analytics) : आयआयएम कोलकाता
- वित्त (finance) : जगदीश शेठ स्कूल ऑफ मॅनेजमेंट, बेंगलोर (कर्नाटक)
- व्यवस्थापन (management) : आयआयएम अहमदाबाद
- विपणन (marketing) : जगदीश शेठ स्कूल ऑफ मॅनेजमेंट, बेंगलोर (कर्नाटक) QS(Quacquarelli Symonds):
- १९९०ला स्थापन झालेली लंडनमध्ये स्थित ही संस्था असून जगातील विविध क्षेत्रातील उच्च शिक्षण संस्थांच्या कार्याचे मूल्यमापन करून त्यांची क्रमवारी ही संस्था लावते.