आंतरराष्ट्रीय सौर आघाडीला संयुक्त राष्ट्रसंघाचा निरीक्षक दर्जा
- अलिकडेच संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने भारतामध्ये मुख्यालय असणाऱ्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीला (आयएसए) निरीक्षक दर्जा दिला आहे.
- यामुळे आयएसए आणि संयुक्त राष्ट्रांमध्ये नियमित आणि सुव्यवस्थित सहकार्य प्रदान करण्यात मदत होईल ज्याच्या परिणामी जागतिक ऊर्जा वाढ विकास होईल.
आंतरराष्ट्रीय सौर आघाडी :
-
- स्थापना : ३० नोव्हेंबर २०१५ (पॅरिस येथे)
- मुख्यालय : गुरुग्राम (हरियाणा)
- सदस्य : १०१
- हा एक भारतीय उपक्रम आहे जो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सच्या राष्ट्रपती फ्रांसवा ओलांद यांनी ३० नोव्हेंबर २०१५ रोजी पॅरिस, फ्रान्समध्ये UNFCCC कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज (COP-२१) च्या निमित्ताने सुरू केला होता, ज्यामध्ये १२१ सौर संसाधनांनी समृद्ध अशा कर्कवृत्त आणि मकरवृत्त दरम्यानच्या १२१ देशांचा समावेश असेल.
- संयुक्त राष्ट्रांच्या सर्व सदस्यांना आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे सदस्यत्व खुले आहे.
- भारतात मुख्यालय असणारी ही पहिलीच आंतरराष्ट्रीय संघटना आहे.
- सौर ऊर्जा विषयीचे भारताचे इतर उपक्रम :
१. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर अभियान – ११ जानेवारी २०११
या अभियानांतर्गत २०२२ पर्यंत सौर ऊर्जेद्वारे एकूण १०० गिगावॅट ऊर्जा प्राप्त करण्याचे उद्दिष्ट आहे.
२. २ ऑक्टोबर २०१८च्या पहिल्या परिषदेत पंतप्रधान मोदींनी एक जग, एक सूर्य, एक ग्रिड (One World, One Sun, One Grid) ही संकल्पना मांडली. याद्वारे आंतरदेशीय सौर ऊर्जा जाळे निर्माण करण्याचा सरकारचा हेतू आहे.
३. सौर शहर योजना – २०११
-
- या योजनेमध्ये ५० हजार ते ५ लाख लोकसंख्येची ६० शहरे निवडण्यात येणार असून संबंधित शहराच्या पारंपरिक ऊर्जेच्या वापरात किमान दहा टक्के कपात करणे तसेच नवीकरणीय ऊर्जेचा वापर वाढवणे याचा समावेश होतो.
- महाराष्ट्रातील नागपूर, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, औरंगाबाद, नांदेड आणि शिर्डी या सहा शहरांची निवड सौर शहर योजनेद्वारे करण्यात आली आहे.
- काही महत्त्वाच्या सौर ऊर्जा संस्था :
- भारतीय सौर ऊर्जा महामंडळ (Solar Energy Corporation of India) :
- स्थापना : २० सप्टेंबर २०११
- जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर अभियानाच्या अंमलबजावणीसाठी नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयांतर्गत या संस्थेची स्थापना झाली होती.
- परंतु सध्या नवीकरणीय ऊर्जेचे सर्व प्रकार या संस्थेच्या अखत्यारीत असल्यामुळे २०१५ पासून तिचे नाव बदलून ‘भारतीय नवीकरणीय ऊर्जा महामंडळ’ असे करण्यात आले आहे.
राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्था(National Institute of Solar Energy) :
- सौर ऊर्जा केंद्र म्हणून १९८८ साली स्थापना
- २०१३मध्ये राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्थेमध्ये रूपांतर
- मुख्यालय : गुरुग्राम (हरियाणा)
- कार्य : सौर ऊर्जा क्षेत्रात संशोधन आणि विकास, चाचणी, प्रमाणीकरण, कौशल्य विकास इत्यादी