आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या गव्हर्नर मंडळाद्वारे आतापर्यंतचे सर्वात मोठे एसडीआर वाटप मंजूर
- जागतिक अर्थव्यवस्थांमधील तरलता वाढवण्यासाठी व कोविड-19चा अर्थव्यवस्थांवरील परिणाम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) गव्हर्नर मंडळाने 650 अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढ्या किमतीचे एसडीआर (Special Drawing Rights) वाटप करण्याला मंजुरी दिली आहे.
- आयएमएफच्या इतिहासातील एसडीआर वाटपाची ही सर्वात मोठी वेळ आहे.
एसडीआर म्हणजे काय?
- अमेरिकन डॉलर, चायनीज युआन, जापनीज येन, युरो आणि ब्रिटिश पौंड या चलनांवर आधारित हे एक परिमाण आहे.
- आयएमएफद्वारे याची सुरुवात 1969मध्ये करण्यात आली.
- येथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे एसडीआर हे चलन नसून आयएमएफमधील सदस्य राष्ट्रांच्या असणाऱ्या कोट्याची क्षमता दाखवण्याचे माध्यम आहे.
- वरील पाच चलनांना वेगवेगळा भार देऊन एसडीआरचे मूल्य ठरवले जाते.
- ज्या देशाकडे जेवढे जास्त एसडीआर तो देश तेवढ्या प्रमाणामध्ये वरील पाच चलनांच्या रूपात तरलता प्राप्त करू शकतो.
- एखादा श्रीमंत देश आपले एसडीआर एखाद्या गरीब देशाला सुद्धा देऊ शकतो.
- एसडीआरला ‘पेपर गोल्ड’ असेही म्हणतात.
- सध्या वाटप करण्यात येणाऱ्या एसडीआरपैकी 275 अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढ्या किमतीचे एसडीआर हे विकसनशील आणि कमी उत्पन्न असणाऱ्या अर्थव्यवस्थांच्या विकासासाठी राखीव ठेवले जातील.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) :
- स्थापना : 27 डिसेंबर 1945 (ब्रेटनवूड परिषदेमध्ये)
- मुख्यालय : वॉशिंग्टन, (अमेरिका)
- सदस्यसंख्या : 189
- अहवाल : world economic outlook, global financial stability report, fiscal monitor
- उद्दिष्टे :
-
- आंतरराष्ट्रीय चलन विनिमय दर स्थिर राखण्यास मदत करणे.
- विविध देशांना व्यवहार तोलातील असंतुलन दूर करण्यासाठी सहाय्य करणे.
- आंतरराष्ट्रीय व्यापार वृद्धिंगत करणे.