आंतरराष्ट्रीय दारिद्र्यनिर्मूलन दिन

आंतरराष्ट्रीय दारिद्र्यनिर्मूलन दिन

 • सुरुवात : १९९२पासून 
 • संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने (UNGA) १९९२ मध्ये दरवर्षी १७ ऑक्टोबर हा ‘आंतरराष्ट्रीय दारिद्र्यनिर्मूलन दिन’ आयोजित करण्याचा प्रस्ताव जाहीर केला.
 • या दिवशी दारिद्र्यनिर्मूलनासाठी विविध राष्ट्रांकडून केले जाणारे प्रयत्न, विविध विकासकामे व योजना यासंबंधी माहिती जाहीर केली जाते.
 • अत्यंत गरिबी, हिंसा आणि उपासमारीमुळे बळी पडलेल्यांच्या सन्मानार्थ १७ ऑक्टोबर १९४८ रोजी पॅरिसमध्ये १ लक्षाहून अधिक लोक एकत्र येऊन ‘मानवाधिकार सार्वत्रिक घोषणापत्रावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या, म्हणून या दिवसाला स्मरून या तारखेची निवड करण्यात आली.
 • थीम २०२१ : “Building forward together: Ending Persistent Poverty, Respecting all People and our Planet.”
 • थीम २०२० : ‘ Acting together to achieve social and environmental justice for all’
 • जगभरामध्ये गरिबी हटविण्यासाठी केल्या जाणार्‍या प्रयत्नांच्या बाबतीत जागरूकता वाढविणे.

दारिद्र्य म्हणजे काय ?

 • दारिद्र्य म्हणजे नक्की काय? या प्रश्नाचे उत्तर शोधताना खालील दोन संकल्पना आपल्याला लक्षात घ्यायला हव्यात. 

निरपेक्ष दारिद्र्य (Absolute Poverty)

 • ज्यावेळी दारिद्र्य मोजताना कशाच्याही निरपेक्ष मानकाचा वापर केला जातो, तेव्हा त्याला निरपेक्ष दारिद्र्य असे म्हणतात.
 • उदा. १९७४मधील नियोजन आयोगाच्या कॅलरीमूल्य मानकानुसार ग्रामीण भागात ज्याला प्रतिदिन २४०० कॅलरीज् अन्न मिळू शकत नाही तो द्रारिद्र्यरेषेखाली (Below Poverty Line) समजला जाई.
 • भारतात दारिद्य्र मोजण्यासाठी निरपेक्ष दारिद्र्य विचारात घेतात.
 • जागतिक बँक (WB) देखील प्रतिव्यक्ती प्रतिदिन १.९ डॉलर्स क्रयशक्ती हे निरपेक्ष मानक वापरते.

सापेक्ष दारिद्र्य (Relative Poverty)

 • या संकल्पनेत लोकसंख्येतील एकूण श्रीमंत व गरीब यांची तुलना करून एक सरासरी काढली जाते व त्या सरासरीपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांचा दारिद्र्यामध्ये विचार केला जातो.
 • ‘त्याच्यापेक्षा हा गरीब’ याला सापेक्षता म्हणतात.

बहुआयामी निर्धनता निर्देशांक (MPI) 

 • १९९७ पासून मानव विकास अहवाला (HDI) मध्ये मानव निर्धनता निर्देशांक देत असत. परंतु २०१०पासून याऐवजी MPI दिला जातो. MPI हा Oxford Poverty and Human Development Initiative ही संख्या मोजत असते.

MPI कसा मोजतात? 

 • MPI म्हणजे Multidimensional Poverty Index
 • हा मोजण्यासाठी आरोग्य शिक्षण आणि राहणीमान हे तीन आयाम विचारात घेतले जातात.
 • हे तीन आयाम खालील १० प्रमापकांमध्ये विभागून त्या प्रमापकांना विशिष्ट भार दिला जातो. 

आरोग्य :

 • पोषण
 • बालमृत्युदर

शिक्षण : 

 • शालेय शिक्षणातील वर्षे
 • शाळेतील पटनोंदणी

राहणीमान :

 • वीजपुरवठा
 • पिण्याचे पाणी
 • स्वच्छता 
 • फरशी
 • इंधन
 • मालमत्ता
 • प्रत्येक घटकाला गुण दिले जातात व वरील १० घटकांच्या आधारे दारिद्र्याची तीव्रता आणि प्रमाण काढले जाते.
 • दारिद्र्याची तीव्रता आणि प्रमाण यांच्या गुणाकारातून MPI मिळतो.
 • वरील घटकांमध्ये ३३.३३% पेक्षा जास्त अभाव असेल तर त्याला ‘बहुआयामी गरीब’ असे म्हणावे. ३३.३३ ते २०% अभाव असेल तर हा ‘असुरक्षित’ (Vulnerable) गटात असून कधीही बहुआयामी गरीब होऊ शकतो. ५०% पेक्षा जास्त अभाव असणार्‍यांना ‘तीव्र बहुआयामी गरीब’ म्हणावे.
 • OPHI च्या २०१८च्या अहवालात भारताचा MPI ०.१२१ होता.

भारत आणि दारिद्र्य :

वर्ष दारिद्र्यगणनांसंबंधी समित्या भारतातील एकूण दारिद्र्य
ग्रामीण शहरी एकूण
१९६०-६१ पी.डी. ओझा ५१.६% ७.६% ४४%
१९६०-६१ दांडेकर व रथ ४१%
१९६९ बी.एस. मिन्हास ५०.६%
१९६८-६९ पी.के. बर्धन ५४%
१९७३-७४ माँटेकसिंग अहलुवालिया ४६.१%
१९८९ दत्त & मार्टिन (Poverty Gap) ४५.१% ४३.९%
१९८७-८८ मिन्हास-जैन-तेंडुलकर ४४.८% ३६.५% ४२.७%

नियोजन आयोग संबंधित समित्यांची दारिद्र्यगणना :

वर्ष समितीचे नाव दारिद्र्य
ग्रामीण शहरी एकूण
१९७३-७४ अलघ कार्यगट ५६.४% ४९% ५४.९%
१९९३-९४ लकडावाला समिती ३७.३% ३२.४% ३६%
२००९-   १० सुरेश तेंडुलकर समिती ३३.८% २०.९% २९.८%
२०११-१२ सुरेश तेंडुलकर समिती २५.७% १३.७% २१.९%
२०११-१२ रंगराजन समिती ३०.९% २६.४% २९.५%

Contact Us

  Enquire Now