अमेरिका भारताला कच्चे तेल पुरवठा करणारा चौथा सर्वोच्च देश
- ‘स्टॅटिस्टिकल रिव्ह्यू ऑफ वर्ल्ड एनर्जी’ अहवालाच्या 70व्या आवृत्तीनुसार अमेरिका 2020 मध्ये भारताला कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा करणारा चौथ्या क्रमांकाचा देश ठरला आहे.
- 2017 मध्ये अमेरिकेने कच्च्या तेलाची निर्यात सुरू केली असली तरी 2020 मध्ये भारताच्या एकूण 204 दशलक्ष टनांच्या आयातीत सुमारे 5 टक्के त्याचा पुरवठा होता.
- 2020 मध्ये भारतातील अव्वल कच्चे तेल पुरवठादार
देश तेलपुरवठा (दशलक्ष टन)
- इराक 47
- सौदी अरेबिया 38
- संयुक्त अरब अमिराती 22
- अमेरिका 10.7
मुख्य मुद्दे
- 2020 मध्ये जगातील एकूण प्राथमिक ऊर्जा वापराच्या तुलनेत 4.5 टक्क्यांनी घट झाली, जी 1945 नंतरची सर्वात मोठी घसरण आहे.
- ऊर्जेच्या वापरामधून होणारे जागतिक कार्बन उत्सर्जनही 6.3 टक्क्यांनी घसरले.
- सन 2020 मध्ये जागतिक स्तरावरील नैसर्गिक वायू (LNG) व्यापारात 0.6 टक्क्यांनी वाढ झाली असून भारताने सुमारे 36 अब्ज घनमीटर एलएनजी आयात केले आहे.
- जपान हा जगातील नैसर्गिक वायू (LNG) आयात करणारा अव्वल देश आहे.
- 2020 मध्ये भारताच्या कोळशाच्या वापरामध्ये 1.1 एक्साज्यूल्सने घट झाली.
- सन 2020 मध्ये चीन जगातील सर्वात मोठा कच्चे तेल आयातकर्ता देश असून सौदी अरेबिया सर्वाधिक पुरवठा करणारा देश ठरला आहे.
- 2020 मध्ये इराक भारताला कच्चे तेल पुरवठा करणारा अव्वल देश ठरला आहे.