अमृत योजना :
- सुरुवात : २५ जून २०१५
- हेतू : शहरी मूलभूत सुविधा आणि पायाभूत सुविधांचा विकास करणे
- उद्देश : प्रत्येक शहरी घरापर्यंत पिण्याचे स्वच्छ पाणी व सांडपाणी सुविधा, उद्याने आणि वृक्षलागवड यांसारखे पर्याय वापरून शहरातील हिरवळ वाढवणे, शहरांमध्ये पोषक वातावरण निर्माण करून प्रदूषण कमी करणे इ.
- एकूण ५०० शहरांचा विकास अमृत योजनेअंतर्गत करण्यात येत असून पुढील आठ घटक निकष म्हणून वापरले जातील.
- सांडपाणी सुविधा, पाणी निचरा, शहरी वाहतूक, हरित उद्याने, मलव्यवस्थापन, पाणीपुरवठा, सुधारणा व्यवस्थापन व सहाय्य आणि क्षमता बांधणी.
- शहरी स्थानिक मंडळ या योजनेची अंमलबजावणी करतात.
- १ ऑक्टोबरला घोषित केलेल्या अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत सांडपाणी आणि मलव्यवस्थापन यांच्या प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्यात येऊन स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
- तसेच ४७०० शहरांमध्ये एकूण २.६८ कोटी नळांची जोडणी करण्यात येईल.
- योजनेअंतर्गत असणार्या ५०० शहरांमध्ये शंभर टक्के सांडपाणी व्यवस्थापनासाठी पाईपांचे जाळे निर्माण करण्यात येईल.
- २५ जून २०१५ रोजी अमृत योजनेसोबतच १०० शहरांसाठी स्मार्ट सिटी मिशन सुरू करण्यात आले. या शंभर शहरांमध्ये महाराष्ट्रातील पुणे, सोलापुर, कल्याण – डोंबिवली, नागपूर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद आणि पिंपरी-चिंचवड या आठ शहरांचा समावेश आहे.