अबनिंद्रनाथ ठाकूर यांची १५० वी जयंती
-
- ७ ऑगस्ट २०२१ रोजी अबनिंद्रनाथ ठाकूर यांची १५० वी जयंती पार पडली.
- अबनिंद्रनाथ टागोर (७ ऑगस्ट १८७१ – ५ डिसेंबर १९५१)
-
- रविंद्रनाथ टागोर यांचे पुतणे.
- कलेच्या माध्यमातून इंग्रजांविरुद्ध त्यांनी लढा दिला.
- भारतातील कलेलाच सर्वाधिक महत्त्व देऊन युरोपच्या दिग्गज चित्रकारांकडून कलेचे धडे त्यांनी घेतले.
- मुघल आणि राजपूत चित्रकलेने ते विशेष प्रभावित होते व याच चित्रशैलींना आधुनिक रूप त्यांनी दिले.
- भारतीय कलेत स्वदेशी विचार आणून त्यांनी भाऊ गगनेंद्रनाथ टागोर यांच्या सोबत मिळून इंडियन सोसायटी ऑफ ओरिएंटल आर्टची स्थापना केली.
- तसेच १९०२ मध्ये जपानी तत्त्वज्ञानी आणि सौंदर्यशास्रज्ञ ओकाकुरा काकुझो यांची कोलकाता भेटही त्यांच्यासाठी प्रेरणेचा स्रोत ठरली.
- त्यांचे बहुतांशी कार्य हे हिंदू तत्त्वज्ञानाशी संबंधित आहेत.
- त्याच्या उत्तर काळात, चिनी आणि जपानी सुलेखन परंपरा त्यांच्या शैलीत उतरविणे सुरू केले; यामागील त्यांचा हेतू आधुनिक पॅन-आशियाई कलात्मक परंपरा आणि पूर्व कलात्मक आणि अध्यात्मिक संस्कृतीच्या सामान्य घटकांचे एकत्रीकरण करणे हा होता.
- १९४२ मध्ये ते विश्वभारतीचे कुलपती झाले.
- प्रसिद्ध चित्रे:
-
- भगिनी निवेदिता यांच्या कल्पनेतून १९०५ च्या बंगालच्या फाळणीच्या काळात अबनिंद्रनाथांनी पहिल्यांदाच भारतमातेला चित्ररुपात साकारले.
- १९३० साली कलकत्त्याचे बदलणारे रूप दाखविण्यासाठी अरेबियन नाईट्स मधल्या कथांचा आधार घेत साकारलेले ‘अरेबियन नाईट्सचे चित्र
- शाहजहानचे निधन
- माझी आई (१९१२-१३)
- फेरीलँड इल्युस्ट्रेशन (१९१३)
- प्रवासाचा शेवट (सुमारे १९१३)
- त्यांच्या चित्रांना भारतीय राष्ट्रीय चित्रशैलीचा दर्जा खुद्द ब्रिटिश आर्ट इन्स्टिट्यूटने दिला आहे.
- साहित्यातील योगदान:
-
- अबनिंद्रनाथ यांना एक कुशल लेखक म्हणूनही ओळखले जाते, ज्यांच्या बऱ्याचशा साहित्यकृती ह्या बालकांसाठी होत्या.
- काही पुस्तके :
अ) बुडोअंगला, खिरेपुतुल आणि राजकाहिनी – बंगाली बालसाहित्याचा सर्वोत्तम उदाहरणे.
ब) त्यांचे मित्र विल्यम रोथेनस्टाईन यांनी रविंद्रनाथ टागोरांना त्यांची ‘गितांजली’ ही साहित्यकृती इंग्रजीत प्रकाशित करण्यास मदत केली होती.
- इतर:
- बंगाल स्कूल ऑफ आर्टच्या प्रमुख कलाकारांपैकी अबनींद्रनाथ हे एक आहेत.
- अबान ठाकूर म्हणून प्रसिद्ध.