अन्नपूर्णा शिखरावर ‘गिरीप्रेमी’ची यशस्वी चढाई, प्रियंका मोहिते पहिली भारतीय महिला
- गिरीप्रेमी या पुण्यातील अग्रणी गिर्यारोहण संस्थेचे गिर्यारोहक भूषण हर्षे, डॉ. सुमित मांढळे व जितेंद्र गवारे यांनी जगातील दहावे उंच शिखर माउंट अन्नपूर्णा-१ वर यशस्वी चढाई केली.
- ज्येष्ठ गिर्यारोहक आणि श्री. शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखालील ‘गिरीप्रेमीची’ ही आठवी अष्टहजारी शिखर मोहीम असून अशी कामगिरी करणारी गिरीप्रेमी भारतातील पहिली नागरी गिर्यारोहण संस्था.
- यानंतर केवल कक्का, भगवान चवले व प्रियंका मोहिते यांनीही अन्नपूर्णाची यशस्वी चढाई केली.
- साताऱ्याची प्रियंका मोहिते अन्नपूर्णा पर्वत सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे.
- आतापर्यंत केवळ २१०च्या आसपास गिर्यारोहकांनी माउंट अन्नपूर्णा-१ची यशस्वी चढाई केली आहे.
अन्नपूर्णा – १ शिखर :
- उंची – ८०९१ मी. (जगातील दहावे उंच शिखर)
- या पर्वतरांगेतील १३ शिखरे ७ हजार मीटर्सपेक्षा उंच
- ५५ किमी लांबीचा अन्नपूर्णा शिखर समूह गंडकी व मार्श्यगदी या हिमनद्यांनी वेढलेला आहे.
- स्थान : नेपाळ हिमालय
- १९५० – मॉरिस हेर्झोग यांच्या नेतृत्वाखाली फ्रेंच गिर्यारोहकांनी सर्वप्रथम हे शिखर सर केले.
प्रियंका मोहिते
- अन्नपूर्णा – १ शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला
- २०१३ – माउंट एव्हरेस्ट (८८४९ मी) यशस्वी चढाई
- २०१६ – माउंट किलीमांजारोवर चढाई
- २०१८ – माउंट ल्होत्से, माउंट मकालूवरही चढाई