अनिरुद्ध जगन्नाथ
जन्म – २९ मार्च, १९३०
मृत्यू – ३ जून २०२१
जीवन परिचय
- मॉरिशसचे माजी अध्यक्ष आणि पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ यांचे निधन झाले ते ९१ वर्षांचे होते.
- मॉरिशस हा गोव्यापेक्षा लहान आणि ठाणे शहरापेक्षा कमी लोकसंख्या असलेला देश, पण त्याला जगात महत्त्वाचे स्थान मिळवून देणाऱ्यांत तेथील माजी पंतप्रधान आणि अध्यक्ष अशी दोन्ही पदे भूषविलेल्या अनिरुद्ध जगन्नाथ यांचा मोलाचा वाटा होता.
- १९६३ मध्ये त्यांनी त्यांच्या राजकीय कार्यकीर्दीला सुरुवात केली होती.
- १९६७ ते १९७० या अडीच वर्षाचा अपवाद वगळता तेव्हा ते स्वत:चा ‘ऑल मॉरिशस हिंदू काँग्रेस’ हा पक्ष विसर्जित करून नागरी सेवेत सत्र न्यायाधीश पद स्वीकारले होते.
- १९८३ ते २००३ ‘मिलिटंट सोशालिस्ट मूव्हमेंट’ या पक्षात ते सर्वाधिक काळ होते.
- २००७ मध्ये छागोस बेटावरील वसाहतीच्या राज्याला विरोध केल्याने हा वाद आंतरराष्ट्रीय न्यायालयात (द हेग येथे) गेला.
- अखेर छागोस बेटे हा मॉरिशसचा एक भाग असल्याचे सिद्ध झाले. छागोस बेटावरील मॉरिशसचा हक्क मान्य होण्याचे श्रेय जगन्नाथ यांनाच जाते.
- १९९२ साली मॉरिशस प्रजासत्ताक झाले याआधी जगन्नाथ हे राजकारणात खासदार वा मंत्रिपदावर होते.
- १९९५ मध्ये जगन्नाथ यांना पंतप्रधान पद मिळाले.
- जागतिकीकरणाच्या काळात मॉरिशसची आर्थिक प्रगती झपाट्याने करण्याचे श्रेयही जगन्नाथ यांनाच जाते.
- मॉरिशसमध्ये सुमारे ६७ टक्के लोक भारतीय वंशाचे आहेत.
- २०११ मध्ये अनिरुद्ध जगन्नाथ अध्यक्षपदी असताना त्यांचा मुलगा प्रविन्द यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला होता.
- २०१७ मध्ये जगन्नाथ यांना स्वत:ला मिळालेले पंतप्रधानपद त्यांच्या मुलाला दिल्याने वाद निर्माण झाले व जगन्नाथ घराण्याला उतरती कळा लागली.
- १९८२ ते २०१७ या कालावधीत सहा वेळा देशाचे पंतप्रधानपद भूषविले होते.
- २०२० मध्ये भारताने त्यांना ‘पद्मविभूषण’ या किताबाने गौरविण्यात आले होते.
- त्याआधी त्यांना इंग्लंडच्या राणीकडून उमरावसदृश किताब मिळाला होता.