अनाथ मुलांच्या व्याख्येत बदल

अनाथ मुलांच्या व्याख्येत बदल

 • अधिकाधिक अनाथ मुलांना आरक्षणाचा लाी मिळावा यासाठी अनाथांची व्याख्या विस्तारण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
 • अनाथांचे ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ अशा तीन प्रवर्गात वर्गीकरणात करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 • अनाथ मुलांना नोकरी, शिक्षणामध्ये एक टक्का आरक्षण देण्याचा तसेच अनुसूचित जातीप्रमाणे वय, परीक्षा शुल्क, शिक्षणांतर्गत शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क प्रतिपूतीमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला.
 • अनाथ मुलांच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शैक्षणिक शुल्काची संपूर्ण प्रतिपूर्ती तर उच्च शिक्षणासाठी (पदवी व पदव्युत्तर) शासकीय महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या अनाथ मुलांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती महिला व बालविकास विभागाच्या बाल न्याय निधीतून करण्यात येणार आहे.

अनाथांचे वर्गीकरण अ, ब आणि क तीन प्रवर्गात 

‘अ’ वर्ग ‘ब’ वर्ग ‘क’ वर्ग
 • ज्यांचे आई-वडील, भाऊ-बहिण, जवळचे नातेवाईक, गाव, तालुका, पत्ता याबाबत काहीही माहिती उपलब्ध नाही अशा पूर्णत: अनाथ असलेल्या बालकांचा समावेश असेल.
 • या प्रवर्गामध्ये ज्या मुलांचे आई-वडील मयत आहेत तसेच ज्यांच्या कागदपत्रावर जातीचा उल्लेख करण्यात आलेला नसेल किंवा उल्लेख असला तरी तांत्रिक कारणामुळे जात प्रमाणपत्र काढणे शक्य नसेल.
 • या प्रकारात अशी मुले ज्यांची आई-वडील १८ वर्षे वय होण्यापूर्वी मयत आहेत.
 • या प्रवर्गातील बालकांना नोकरी, शिक्षणामध्ये आरक्षण, शैक्षणिक शुल्कात सवलत मिळेल.
 • या बालकांचे पालन-पोषण बालकांसाठी कार्यरत संस्थेत किंवा अनाथालयात झाले असेल. याही प्रवर्गातील मुलांना ‘अ’ प्रवर्गातील मुलांप्रमाणे सवलती मिळतील.
 • त्या मुलांचे नातेवाईक विशेषत: वडिलांकडचे जिवंत आहेत यांचा समावेश

Contact Us

  Enquire Now