अनाथांचे आरक्षण धोरण, नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह

अनाथांचे आरक्षण धोरण

 • अनाथ मुलांना शिक्षण व नोकरीत एक टक्का आरक्षण देण्याच्या धोरणात बदल करून आता तिन्ही वर्गातील अनाथांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्यात येईल.
 • अनाथांचे अ, ब, क अशा तीन प्रवर्गांत वर्गीकरण करण्यात आले आहे.
अ वर्ग ब वर्ग क वर्ग
ज्यांचे आई-वडील, भाऊ-बहीण, नातेवाईक, गाव, तालुका, पत्ता याबाबत काहीही माहिती उपलब्ध नसलेल्या म्हणून अनाथ असलेल्या बालकांचा समावेश असेल. मुलांचे आईवडील मयत आहेत तसेच ज्यांच्या कागदपत्रावर जातीचा उल्लेख नसेल किंवा असला तरीही तांत्रिक कारणामुळे जात प्रमाणपत्र काढणे शक्य नसेल अशा अनाथांचा समावेश या वर्गात अशी मुले ज्यांची आई-वडील मुलांचे वय 18 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी मयत आहेत.
 • अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गातून देण्यात येणाऱ्या १ टक्का आरक्षणाऐवजी दिव्यांगांच्या धर्तीवर १ टक्का समांतर आरक्षण देण्यात येईल.
 • अनाथ मुलांच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शैक्षणिक शुल्काची संपूर्ण प्रतिपूर्ती तसेच उच्च शिक्षणाच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती महिला व बालविकास विभागाच्या बाल न्याय निधीमधून करण्यात येईल.

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह

 • केंद्रपुरस्कृत नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह योजनेत राज्य सरकारचाही सहभाग
 • या योजनेच्या केंद्र शासनाच्या २२ नोव्हेंबर २०१७ रोजीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
 • त्यानुसार नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह बांधण्यासाठी/वसतिगृहाची इमारत भाडे तत्त्वावर उपलब्ध करून अनुदान देण्याची सुधारीत योजना राबविण्यात आली आहे.
 • यापूर्वी ही योजना केंद्र आणि स्वंयसेवी संस्था यांच्या ७५:२५ सहभागातून राबविली जात होती.
 • आता केंद्र:राज्य:स्वयंसेवी संस्था यांच्या हिश्श्याचे प्रमाण ६०:१५:२५ असे असेल.

Contact Us

  Enquire Now